वराहांच्या हैदोसाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:14 AM2017-11-06T00:14:56+5:302017-11-06T00:15:07+5:30
चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. याचा फटका चिकणी येथील शेतकरी सुधाकर महादेव डायरे यांना बसला. वनविभाग मात्र या वराहांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार परिसरातील शेतकरी करतात.
येथील सुधाकर डायरे यांचे परिसरात चार एकर ओलीताचे शेत आहे. सध्या शेतातील कपाशीचे पीक चांगले बहरले आहे. अशातच वराहाने हैदोस घालुन पिकांची नासाडी केली. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक कोसळले आहे. वराहांनी कपाशीचे झाडे मोडल्यामुळे झाडाला असलेली बोंडे वाळत आहे. शेतातील कापूस अणि झाडे नष्ट होत असल्याने तोंडाशी आलेला घास हिसकावल्याचा प्रकार असल्याचे बोलले जाते. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकºया पडला आहे. तसेच कर्जाची परतफेड करण्याची आशा यामुळे माळवली आहे. अशा संकटामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. एकीकडे शेतात वीजप्रवाह सोडला तर वनविभाग कारवाई करते. पेरणीपासून ते पीक काढण्यापर्यंत शेतकºयांना या श्वापदांपासून पिकांचे रक्षण करावे लागते. मात्र हे श्वापद तोंडचा घास हिसकावुन घेतात. वनअधिकाºयांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.
लागवडीचा खर्चही व्यर्थ
बि-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक, निंधन, आंतरमशागत इत्यादीवर जवळपास दीड लाखापर्यंत खर्च झाला. वराहांच्या उद्रेकामुळे हा पूर्ण खर्च व्यर्थ जाण्याची वेळ सदर शेतकºयावर आली असून या नुकसानीची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.