सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहनांना हिरवा रंग

By Admin | Published: September 16, 2016 02:54 AM2016-09-16T02:54:58+5:302016-09-16T02:54:58+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण

Green color for public distribution system vehicles | सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहनांना हिरवा रंग

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहनांना हिरवा रंग

googlenewsNext

वर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण करण्यात येणार आहे. याकरिता लागणारी वाहने एकाच रंगाची राहणार आहे. धान्याचा पुरवठा करणारी ही वाहने हिरव रंगाची राहणार आहे. या एकाच रंगामुळे सामान्य नागरिकांनाही ही वाहने ओळखणे शक्य झाले होणार असून यात होणाऱ्या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे.
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंकींग करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख ५७ हजार ४५ शिधापत्रिका धारक आहे. यामध्ये ६५ टक्के आधार लिकींग झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ घेणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य गटामध्ये ८ लाख ८२ हजार ३६७ लाभार्थी असून यातील ९५ टक्के लाभार्थ्यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहेत. याशिवाय राज्यशासनाने सर्व शेतकऱ्यांना स्वस्त दराने धान्य वितरण सुरू केले असून अशा शेतकऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ९१६ एवढी आहे. या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्यात येते.
भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्वस्त धान्य दुकानदार या प्रवासात होणारी धान्याची चोरी थांबविण्यासाठी जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्य पोहचविण्यासाठी ३४ वाहने वापरण्यात येत आहेत. तर राज्य शासनाने गोदाम ते रास्तभाव दुकानांमार्फत ७८ वाहनांमार्फत धान्य पोहचविण्यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्यासाठी हिरव्या रंगाने रंगवण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘सुधारित धान्य वितरण प्रणाली, महाराष्ट्र शासन’ असा फलक वाहनाच्या समोरील भागावर लावण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी उतरत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर सामान्य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल, असे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Green color for public distribution system vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.