कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:06 AM2017-11-27T01:06:57+5:302017-11-27T01:07:18+5:30

डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाऱ्या भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे.

The green zone increased by the Kolhapuri dam | कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

Next
ठळक मुद्देलघुसिंचन विभागाच्या नियोजनाचा फायदा : रबी पिकांना सिंचनाचा लाभ

ऑनलाईन लोकमत 
आष्टी (शहीद) : डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाºया भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे. यामुळे रेड झोन क्षेत्रातील पिकांसाठी मोठा लाभ होत असून ७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत झाली आहे.
तालुक्यातील बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा या गावांना बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्याचे पाणी संपले की सतत कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होते. या भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात असल्याने दूध, दही, ताक, लोणी उत्पादन जास्त आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा असल्यामुळे आर्थिक लाभ होण्यास मदत होते. शेतीसाठी सिंचन व्यवस्था म्हणून विहिरी आहे; पण त्या खडकाळ भागात पाणी उपलब्ध नाही. खरीप हंगाम झाल्यावर रबीची पेरणी फार कमी होत होती. यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडे सतत पाठपुरावा करून कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले. त्याचे काम पूर्ण झाले असून पाणीसाठा संचयीत करण्यास मदत झाली आहे.
थारमध्ये प्रथम क्रमांकाच्या बंधाऱ्यामध्ये ८९ टीसीएम पाणीसाठा असून २० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. थारमध्ये द्वितीय क्रमांकाच्या बंधाऱ्यात ६२ टीसीएम पाणीसाठा असून १९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. बोटोणा मध्ये ७५.६० टीसीएम पाणीसाठा असून ३४ हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. बोरखेडी मध्ये ४४ टीसीएम पाणीसाठा आहे. यामध्ये ९ हेक्टर सिंचन होणार आहे. सध्या बंधाºयाचे गेटची पूर्ण लेव्हल पाण्याने भरली आहे.
या सर्व बंधाऱ्याची पाहणी कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत, उपविभागीय अभियंता डी.के. लांडगे, शाखा अभियंता, विनीत साबळे यांनी केली असून समाधान व्यक्त केले आहे. शेतकºयांसाठी या जलसाठ्याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The green zone increased by the Kolhapuri dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.