बापूंना अभिवादन करून वृक्षदिंडी चंद्रपूरकडे मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:28 PM2019-06-24T21:28:56+5:302019-06-24T21:29:18+5:30
हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्र स्थानी ठेऊन वृक्ष लावा... वृक्ष जगवा असा संदेश देणाऱ्या वृक्षदिंडी आंजी (मोठी) येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. या वृक्षदिंडीत सहभागी वृक्षपे्रमींनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सोमवारी अभिवादन केले. त्यानंतर ही वृक्षदिंडी समुद्रपूर मार्गे चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्र स्थानी ठेऊन वृक्ष लावा... वृक्ष जगवा असा संदेश देणाऱ्या वृक्षदिंडी आंजी (मोठी) येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. या वृक्षदिंडीत सहभागी वृक्षपे्रमींनी सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सोमवारी अभिवादन केले. त्यानंतर ही वृक्षदिंडी समुद्रपूर मार्गे चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली.
वृक्षारोप व वृक्षसंवर्धानासाठी एक मोठी लोकचळवळ उभी राहवी. तसेच वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. वृक्षदिंडीत सहभागी झालेल्या सुमारे १०० च्यावर वृक्षपे्रमींनी सकाळी येथील गांधी आश्रम गाठले. त्यांना मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास, बा व बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदींची माहिती दिली. या वृक्षदिंडीतील वृक्षपे्रमी गावागावात जाणून तेथील नागरिकांना वृक्षाचे महत्त्व पटवून देत आहे. ही वृक्षदिंडी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पारडशिंगा, नागपूर असे मार्गक्रमण करणार आहे. तर वृक्षदिंडीचा समारोप उमरेड येथे होणार आहे.
चिकणी (जामणी) येथील बसस्थानकाच्या आवारात वृक्षदिंडीचे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आणि आ. अनील सोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ग्रामस्थांना वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी सुनील गफाट, नंदु झोटींग, गजानन धुतारे, गौरव गावंडे, नितीन चांदेकर, प्रशांत देशमुख, मधुकर इंगोले, गणेश झोटींग, वासुदेव कोवे, लखन कुमरे, प्रशांत डफरे, राजु कांबळे, अनिल पेंदोर आदींची उपस्थिती होती. तसेच दहेगाव (स्टेशन), बोदड (मलकापूर) येथे ही वृक्षारोपण करण्यात आले.
समुद्रपुरात दिंडीचे स्वागत
आमदार प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात निघालेल्या वृक्षदिंडीचे दारोडा, मांडगाव मार्ग समुद्रपुर येथे आगमण झाले. यावेळी नगराध्यक्ष गजानन राऊत यांनी प्रा. अनिल सोले व त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. यावेळी किशोर दिघे, सभापती कांचन मडकाम, उपसभापती योगेश फुसे, आशिष वांदिले, विजय फडनवीस, सुनिल गफाट, शैलेश ढोबळे, प्रविण चौधरी, भोलानाथ सहारे, तारा अडवे आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित जि.प. सदस्य मृणाल माटे यांचा कडूलिंबाचे झाड देवून आ. सोले यांनी सत्कार केला.
विरुळात वृक्षदिंडीचे स्वागत
विरुळ (आकाजी) : रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वृक्षदिंडी विरुळ येथे पोहोचल्यावर दिंडीचे स्वागत ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान आ. अनिल सोले यांच्या हस्ते येथील आकाजी महाराज मंदिर परिसरात तसेच ग्रा.पं.च्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी आमदार दादाराव केचे, सुनील गफाट, अशोक निकम,पं.स.सदस्य शोभा मनवर, बाबू चाफले, देवेंद्र चाफले, छत्रपती नासरे, प्रमोद सोनटक्के, रवी कुरसंगे, भास्कर वलगावकर, गोविंद वाघमारे आदींची उपस्थिती होती.