स्वयंस्फूर्त रक्तदानातून बाबूजींना अभिवादन
By admin | Published: July 3, 2016 02:07 AM2016-07-03T02:07:16+5:302016-07-03T02:07:16+5:30
लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या .....
लोकमत व युवा सोशल फोरमचा संयुक्त उपक्रम : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूकडून रक्तसंकलन
वर्धा : लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवा सोशल फोरमच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २१ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करुन श्रद्धेय बाबूजींना आदरांजली वाहिली.
श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, प्रवीण गावंडे, लोकमतचे कार्यालय प्रमुख उमेश शर्मा, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांच्या उपस्थितीत बाबूजींच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. रक्तदान कार्यक्रमाला युवा सोशल फोरमच्या युवकांसह महाविद्यालयातील युवकांनी गर्दी केली होती. युवकांना रक्तदानाने आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. याची माहिती देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने येथे पत्रकांचे वितरण केले. शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. यात सुधीर पांगुळ, कुणाल भगत, आशिष मुळे, नामदेव तडसिंगे, चेतन देशमुख, शशांक बेलकुंडे, तिलक कारवटकर, शिरिष खैरकार, अभिास्रत कुत्तरमारे, जतीन साळवे, निर्भय कारवटकर, निलेश राऊत, कृणाल भोंगे, सुधीर देशमुख, अतुल शेगावकर, दीपक देशमुख, आशिष मोहरले, निलेश उडदे, पराग मगर, प्रशांत हेलोंडे आदींचा समावेश होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रोहन गवळी, जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे यांच्यासह किशोर कोटंबकार, अरविंद होले, मनोज बघेल आदींनी रक्त संकलन केले. कार्यक्रमाच्या यशाकरिता प्रियंका मोहोड, मयूर डफळे, अमर कोठेकार व फोरमच्या सदस्यांनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)