रक्तदानातून जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:37 PM2019-07-02T21:37:30+5:302019-07-02T21:37:48+5:30
ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा कार्यालयाचे प्रमुख उमेश शर्मा होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा सोशल फोरमचे संस्थापक सुधीर पांगुळ, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय आदींची उपस्थिती होती. या शिबिरात लोकमत परिवारातील सदस्यांसह शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी डॉ. राज वाघमारे, डॉ. चकोर (राठोड), डॉ. देवर्षी धांदे, प्रवीण गावंडे, युवा सोशल फोरमचे मिलिंद मोहोड, इरफान बेग, वैशाली जैन, वैभव देवगीरकर, पझारे, विशाल हजारे आदींनी विशेष सहकार्य लाभले. यावेळी लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सखींनी वृक्षारोपण करून अर्पण केली श्रद्धांजली
मंगळवारी लोकमत सखीमंचच्यावतीने वर्धा शहरातील हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी वृक्षारोपण करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला लोकमत सखी मंचच्या दीपाली मंगरूळकर, सुनीता मेहरे, ज्योती देवतारे, सुनीता बावनेर, धनश्री भांडेकर, नलिनी पहाडे, पूनम उजवणे, योगीता मानकर, जया इंगोले, शारदा बन्नागरे, माधुरी गायकवाड, अरूण बोदडे, स्मिता रोहनकर, नेहा धोंगडी, वंदना मंथनवार, करुणा शेंडे, विजया तिमांडे, ज्योती गुंडापुरे, अनिता बन्नागरे, वर्षा बोकडे, संगीता तुराळे, मीना ढाले, रत्नमाला डोंगरे, स्मिता शिंदे, भावना वाडीभस्मे, कीर्ती बोरकर, स्वाती सावळे आदींची उपस्थिती होती.