गिरड झाले ‘अ‍ॅग्रोहब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:02 AM2018-07-30T00:02:31+5:302018-07-30T00:03:24+5:30

वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

Grid 'Agrobe' | गिरड झाले ‘अ‍ॅग्रोहब’

गिरड झाले ‘अ‍ॅग्रोहब’

googlenewsNext
ठळक मुद्देमगन संग्रहालय समितीचा उपक्रम : शेतकऱ्यांना मिळाला आधार

सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. बदलती शेती पध्दती, बिज संवर्धन, शेती निविष्ठा निर्मिती शेतीच्या एकूण वाढत्या उत्पादन खर्चावर मात करण्यासाठी बीज संवर्धन, विविध निविष्ठांची निर्मिती, वापर आणि याबद्दल शेतकºयांत जागृती, प्रचार-प्रसार या केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेती चळवळ उभारण्यात आली आहे.सध्या गिरड हे शेतकºयासाठी अ‍ॅग्रोहब म्हणून ओळखले जात आहे. या माध्यमातून शेतकºयासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
शेती अवजारे तयार करणारे वर्कशॉप
या केंद्रातर्गत संलग्न शेतकऱ्यांना मनुष्य चलीत छोट्या छोट्या औजारांची निर्मिती करण्यात येते. यात खुरपणी यंत्र, दतार, पंजा, डौरा आदी औजार १५० ते २०० रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतात. शिवाय केंद्र परिसरातील गावात मोबाईल वेल्डिंग वर्कशॉपची सुविधा शेतकºयांच्या मागणी नुसार दिली जाते.

विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपारिक घानी बंद पाडणे हे शासनाचे षडयंत्रच आहे. शासनाकडून पारंपारिक घानीला प्रोत्साहन देणाºया कुठल्याच योजना नसल्या तरी तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा आत्मा आहे.
डॉ.विभा गुप्ता, अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा
२ हजार २५० शेतकरी व ४ हजार महिलांचा सहभाग
गिरड येथील नैसर्गिक शेती विकास केंद्र सन २००५ मध्ये स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून समुद्रपुर तालुक्यातील शेकडो गावात नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार, प्रात्यक्षिके, महिला बचत गट समुह, शेतकरी मंडळाची उभारणी करण्यात आली. यात ६० मंडळात २२५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तर २२६ महिला बचत गटाच्या फळीत ४००० महिलांचा सहभाग आहे. या केंद्रावरुन सहभागी नागरिकांना ग्राम स्वच्छता व आरोग्य, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, देशज बीज संवर्धन अभियान, नैसर्गिक शेती अभियान, स्वदेशी चळवळ, तेल स्वराज आदी उपक्रमातून जोडण्यात आले आहे.
कापूस ते कपडा उत्पादन
कापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगापर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टर मध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहे. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.
सहा गोमूत्र संकलन केंद्राची निर्मिती
नैसर्गिक निविष्ठांसाठी लागणारे गोमूत्राची पूर्तता करण्यासाठी ६ गोमूत्र संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील शिवणफळ, वानरचुहा, साखरा आर्वी, गिरड, भवानपूर येथे गोमूत्र संकलन केंंद्र उभारण्यात आले. या गोमूत्र केंद्रावरुन शेतकरी गोमूत्राची खरेदी करुन निविष्ठांसाठी वापर करतात.
तेल स्वराज्य अभियानातून जवसाचे क्षेत्र वाढले.
मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपारिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात १०५ शेतकºयांचा सहभाग आहे. या शेतकºयांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे. सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करुन तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपारिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समुहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे.
आमची शेती शाळा उपक्रम
मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात आमची शेती शाळा हा उपक्रम राबविल्या जातो. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक जीवन, बदलती आधुनिक शेती पध्दती, ग्रामीण आरोग्य, नैसर्गिक शेती या विविध विषयावर दर महिन्याला शेतकºयांची शाळा भरल्या जाते.

Web Title: Grid 'Agrobe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.