शेताच्या कुंपनावरील जाळे पक्ष्यांकरिता कर्दनकाळ

By admin | Published: January 10, 2017 12:48 AM2017-01-10T00:48:02+5:302017-01-10T00:48:02+5:30

मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार

Groundnut for the fencing of the field | शेताच्या कुंपनावरील जाळे पक्ष्यांकरिता कर्दनकाळ

शेताच्या कुंपनावरील जाळे पक्ष्यांकरिता कर्दनकाळ

Next

 पाणवठ्यांलगतचा प्रकार : वनविभाग व ईआरसीएस इंडियाचे जाळे निर्मूलन अभियान
वर्धा : मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेले खराब जाळे विकत घेवून ते शेताचे कुंपन म्हणून बांधण्याचा प्रकार बोर व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात होत असल्याचे समोर आले आहे. हे जाळे या भागात असलेल्या जलाशयात असलेल्या पाणवठ्यांवर येणाऱ्या पक्षांकरिता कर्दनकाळ ठरत आहे. पारदर्शक व अतिबारीक धाग्यांनी बनलेल्या जाळ्यात अडकून अनेक पक्षांना जीव गमवावा लागल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे शेतातील जाळे काढण्याची मोहीम वनविभाग व ईआरसीएस इंडियाच्यावतीने राबविण्यात आली.
८० ते १०० रुपयात जाळ्यांची खरेदी
४पूर्व विदर्भात अनेक लहान - मोठी धरणे आहेत. जिथे व्यावसायिक मत्स्यमारी केली जाते. या मत्स्यमारीसाठी वापरले जाणारे जाळे काही दिवसात खराब होतात. हे खराब जाळे नजीकचे शेतकरी ८० ते १०० रुपयांत विकत घेतात. हे जाळे शेताच्या धुऱ्यावर बांधून संपूर्ण शेताला वेढल्या जाते. हे जाळे फार बारिक धाग्यांचे बनलेले असते. तसेच जवळपास पारदर्शक भासते व शेकडो पक्षी या जाळ्यामध्ये अडकून मृत्यूमुखी पडत आहेत. यामध्ये बहुतांश वेळी लहान पक्षी अडकतात व त्यांना खाण्यास शिकारी पक्षीदेखील त्यावर झडप घेतात व अडकून मरण पावतात.

शेतकरी बांधवांच्या गैरसमजातून अश्याप्रकारचे जाळे लावण्याचा प्रकार घडत असून शेतकऱ्यांचा समस्या समजावून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. वन्यजीवांबद्दल असलेले विविध गैरसमज व अंधश्रद्धा आपल्याकडील वन्यजीव धोक्यात आणण्यास जबाबदार असून समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना केल्यास वन्यजीवांचे संवर्धन शक्य आहे.
- संजय इंगळे तिगावकर, सदस्य, सल्लागार समिती, बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन विकासात इतर वन्यजीवांप्रमाणेच पक्ष्यांचाही फार मोठा वाटा आहेत. पर्यटक येथील पक्षीजीवन बघण्यासाठी तसेच अभ्यासण्यासाठी येतात, असे असताना आपल्या परिसरात लावण्यात येणाऱ्या जाळ्यांमुळे पक्ष्यांची निसर्गातील संख्या कमी होत आहेत. अनेक दुर्मीळ पक्षीदेखील या जाळ्यामध्ये मारले जात आहेत.
- पराग दांडगे, ईआरसीएस, इंडिया

Web Title: Groundnut for the fencing of the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.