वर्धा जिल्ह्यात ४९ गावांतील ८४०० हेक्टर शेतीला बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:56 AM2019-05-03T11:56:33+5:302019-05-03T11:58:42+5:30

आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेचे काम विरुळ परिसरात सुरू आहे.

Groundnut water for 8400 hectares of farmland in 49 villages in Wardha district | वर्धा जिल्ह्यात ४९ गावांतील ८४०० हेक्टर शेतीला बारमाही पाणी

वर्धा जिल्ह्यात ४९ गावांतील ८४०० हेक्टर शेतीला बारमाही पाणी

Next
ठळक मुद्दे सूक्ष्म सिंचन योजनाराज्यातील पहिलाच प्रकल्पशेतकऱ्यांकरिता ठरेल वरदान

सचिन देवताळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेचे काम विरुळ परिसरात सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्वी तालुक्यातील ४९ गावांतील ८ हजार ४०० हेक्टर शेतीला बारमाही सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी मिळणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदानच ठरणार आहे.
आर्वी तालुक्यात निम्न वर्धा प्रकल्पाला केवळ एकच कालवा आहे. यामुळे प्रकल्पाजवळील डावीकडील भाग व प्रकल्पाच्या मागील भाग प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहिला हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेली लिप्ट इरिगेशन योजना धूळखात होती. तिला सूक्ष्म सिंचन योजनेत परावर्तित करण्यात आले. या योजनेला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. या योजनेसाठी अंदाजे २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सोबतच ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाकरिता निवडण्यात आले. यासाठी विरुळ, रोहणा, धनोडी, खुबगाव या परिसरातील 49 गावातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी विरुळ परिसरात कामाचा प्रारंभ करण्यात आला असून जैन इरिगेशन अंतर्गत या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, कालवा न खोदता मोठे लोखंडी पाईप टाकून पाणी शेतापर्यंत पोहोचविले जाणार आहे. यासाठी जेसीबीने नाल्या खोदून त्यामध्ये मोठमोठ्या जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पाशेजारी लवकरच पंपिग स्टेशनचे काम सुरू होणार आहे. शेजारीच विद्युत पॉवर स्टेशनही निर्माण होणार आहे. जून २०२० पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील पहिलाच प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात राबविला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संबंधित विभागाकडून प्रत्येक कामाची माहिती घेतली जात आहे. वर्धा जिल्ह्याच्या धर्तीवर इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

ड्रिप व तुषार सिंचनाद्वारे पाणी
प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला ड्रिप व तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.त्याकरिता प्रत्येक शेतात पाणी पुरवठ्याची स्वतंत्र योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या सूक्ष्म सिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्याकरिता स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणाही उभारली जाणार आहे. राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित असून या भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या प्रकल्पाचे काम जैन इरिगेशन, जळगाव कंपनी करणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेतच पूर्ण करायचे आहे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांचेही योग्य सहकार्य मिळत आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
- पवळ गहिणीनाथ
प्रकल्प व्यवस्थापक,
जैन इरिगेशन, जळगाव.

Web Title: Groundnut water for 8400 hectares of farmland in 49 villages in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती