गटनेता व शिक्षण सभापतीचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:36 PM2018-01-30T23:36:16+5:302018-01-30T23:36:50+5:30

येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे.

Group Leader and Resignation of Education Chairman | गटनेता व शिक्षण सभापतीचा राजीनामा

गटनेता व शिक्षण सभापतीचा राजीनामा

Next
ठळक मुद्देआष्टी न.पं.तील प्रकार : काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळली

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे. या राजीनाम्यामुळे चांगलीच खळबळ माजली असून त्यांनी हा राजीनामा आमदार अमर काळे यांना रजिस्टर पोस्टाने पाठविला आहे.
शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतमध्ये जावून कर्मचाºयांकडे राजीनामा दिला आहे. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना त्यांनी नगर पंचायतमध्ये दिवसागणिक भ्रष्टाचार फोफावत आहे. गावातील सर्व कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून १० टक्के कमीशनमुळे दर्जा ढासळत आहे. गावाचा विकास ठप्प झाला आहे. सभागृहात चर्चा होत नाही. सभागृहात आवश्यक बाबीचा विचार न होता काही विशिष्ट नगरसेवक पदाधिकारी यांच्या वरदहस्ताखाली खोटेनाटे देयक मंजूर करून गैरकायदेशिररित्या कारभार चालविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय गटनेता व शिक्षण सभापती या नात्याने माहिती देण्यासही टाळाटाळ होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
गावातील नागरिक मला भ्रष्टाचाराचा जाब विचारतात. नाल्या भरल्या त्या उपसायला दोन महिने कंत्राटदाराचे कर्मचारी येत नाही. सार्वजनिक पथदिवे बसविले. यामध्ये एका लाईटची किंमत ५ हजार आहे. फिलीप्स सारख्या लाईटची किंमत ३ हजार आहे. मग दिल्लीमेड चायनीज कंपनीला एवढी मोठी रक्कम देण्यामागचा हेतू काय, याचा आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण सभापती आणि गटनेता असून निर्णय व त्याची अंमलबजावणी देखील मला माहिती नाही. शौचालय बांधकाममध्ये गैरप्रकार करणारे कर्मचारी निलंबित झाले. त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यामुळे मुद्दाम हा सर्व प्रकार सुरू आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला तर माझा आवाज दाबल्या जात आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून मी गटनेता व शिक्षण सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचे ओंकार भोजने म्हणाले.

Web Title: Group Leader and Resignation of Education Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.