महिला हिंसाचाराविरोधात पालकमंत्री केदार यांचा आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:19 PM2020-02-14T16:19:03+5:302020-02-14T16:19:24+5:30
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने वर्ध्याचे पालकमंत्री व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आत्मक्लेष आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने वर्ध्याचे पालकमंत्री व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आत्मक्लेष आंदोलन केले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या आंदोलनाच्या निमित्ताने सामूहिक उपवास, आत्मचिंतन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, श्रीकांत बाराहाते, महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, शिवसेनेचे नेते समीर देशमुख, रायुकॉँच्या अध्यक्ष शरयू वांदिले, इंद्रकुमार सराफ, कॉँग्रेसचे शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, धैर्यशील जगताप, शिवसेनेचे तुषार देवढे आदींसह शेकडो सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.