बोरच्या सफारी झोनमध्ये पाहुण्या वाघाची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:09+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुलगा असलेल्या युवराज हा वाघ तसेच मुलगी पिंकी नामक वाघिणीचेही वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंबिका आणि कॅटरिना या वाघिणींचे वास्तव्य असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनमध्ये रविवारी एका पाहुण्या वाघाने ऐन्ट्री केली. विशेष म्हणजे, हा वाघ सफारी झोनमध्ये दिसताच काहींनी त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सदर पाहूणा वाघ नेमका कोण आहे याबाबतची शहानिशा सध्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सदर वाघ सुमारे पाच ते सहा वर्ष वयोगटातील असावा, असा अंदाजही वर्तविला जात आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुलगा असलेल्या युवराज हा वाघ तसेच मुलगी पिंकी नामक वाघिणीचेही वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात आहे. असे असले तरी सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोन मध्ये एका पाहुण्या वाघाचे दर्शन रविवारी सकाळी अचानक झाल्याने तो वाघ नेमका कोणता याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात बाजीराव नामक वाघ असेपर्यंत कुठहाली दुसरा पाहुणा वाघ या जंगलात सहज प्रवेश करीत नव्हता. इतकेच नव्हे, तर कॅटरिना ही वाघिण दुसºया वाघाला सफारी झोनपर्यंत येऊ देत नव्हती. परंतु, रविवारी सकाळी अचानक पाहुणा वाघ बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनमध्ये दिसल्याने वन्यप्राणी मित्रांच्या भुवया उंचावल्या आहेत.
७ मिनिटात ११ कि.मी. अंतर पार करणारा ‘बाजीराव’
बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ अवघ्या सात मिनीटात सुमारे ११ कि.मी.चे अंतर पार करायचा, असे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले.
यापूर्वीही झाले दर्शन
ज्या पाहूण्या वाघाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी झोनपर्यंत येण्याची मजल मारली त्याच वाघाचे यापूर्वी तीन वेळा इतर ठिकाणी काहींना दर्शन झाले होते. तेव्हा तो जंगल सफारीसाठी पर्यटकांना घेऊन जाणाºया जीपला पाहून थोडा लाजत होता. परंतु, यंदा तो कुठलीही परवा न करता थेट पर्यटकांच्या जीपसमोरून मोठ्या डौलानेच मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव काहींना आला असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रीदायक सुत्रांनी सांगितले.