शाश्वत शेतीशाळेत गोमूत्र व्यवस्थापनावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:35 PM2018-01-29T23:35:06+5:302018-01-29T23:35:37+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महिला विकास सशक्तीकरण परियोजनेंतर्गत विजय येंगडे, बालू महाजन यांच्या शेतात शाश्वत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महिला विकास सशक्तीकरण परियोजनेंतर्गत विजय येंगडे, बालू महाजन यांच्या शेतात शाश्वत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांना शाश्वत शेतीबाबत माहिती देण्यात आली. शिवाय गोमूत्र व्यवस्थापन याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकरी येंगडे यांनी शाश्वत शेतीची गरज विषद केली. जमिनीची क्षमता वाढावी व रासायनिक खताचा वापर कमी व्हावा म्हणून शाश्वत शेती गरजेची असल्याचे सांगितले. यासाठी वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील प्रगतशील शेतकरी येंगडे, महाजन यांच्या शेतात शेतीशाळा प्रात्यक्षिक उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला शेतकरी कुंदनलाल जयस्वाल, चौधरी, जिल्हा व्यवस्थापक ज्ञान व्यवस्थापन मनीष कावडे, तालुका अभियान व्यवस्थापक रजनी श्रीरभय्ये, राजू वानखेडे, प्रभाग समन्वयक आनंद फेतफुलवार, समुदाय कृषी व्यवस्थापक अतुल शेंद्रे, सुरज घायवट, कृषी सखी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा पाटील, सोनी बालपांडे आदी उपस्थित होते.
येंगडे, महानज यांच्या शेतातील शाश्वत शेतीत वापरात असलेल्या पद्धतीची माहिती करून घेण्यात आली. त्यांच्या शेतात असणाºया गांडूळ खत प्रकल्प, कोंबडी पालन, मच्छी पालन, डेमो प्लॉटची पाहणी करण्यात आली. गाईच्या गोमूत्र व्यवस्थापन आदीबाबत माहिती करून घेण्यात आली. प्रशिक्षक राजू वानखेडे यांनी शेती शाळेदरम्यान शाश्वत शेती उपक्रमांतर्गत सेंद्रीय शेती व खतावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेण, माती, गुळ, मिश्र पीक पद्धत, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, ड्रीपलोकिंग पद्धत, सरीवरंभा पद्धत, दशपर्णी, निमआॅईल, गौरी अर्क, बीज प्रक्रिया व फुलशेतीवर प्रात्यक्षिक आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सेंदीय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून उमेद अभियानाद्वारे कृषी उपजीविकेमध्ये गटात समाविष्ट प्रत्येक महिलांच्या शेतात किमान एक एकरमध्ये शाश्वत शेती व प्रत्येक महिलांच्या घरी परसबाग तयार करण्याचे उद्दीष्ट अभियानात ठेवण्यात आले. शेती शाळेला वायफड, सेवाग्राम, तळेगाव प्रभागातील ३० कृषीसखी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतीशाळेला ग्रामसेवक संघ, कृषीसखी सोनी बालपांडे, शेतकºयांनी सहकार्य केले.
नैसर्गिक तथा सेंद्रीय शेती करणे गरजेचे
रसायणांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. मोठ्या प्रमाणात रसायणांचा वापर केला जात असल्याने रसायणयुक्त शेतमाल नागरिकांना आहारात घ्यावा लागत आहे. ही शेती टिकविण्याकरिता शाश्वत तथा नैसर्गिक शेती करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेत प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.