तूर बियाणे वाटप व बोंडअळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:47 PM2018-06-21T23:47:06+5:302018-06-21T23:47:06+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात येत्या हंगामामध्ये तूर पिकाची लागवण करण्यासाठी शेतकऱ्यांकरिता तूर पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले.

 Guidance on distribution of tur seeds and bottleneck management | तूर बियाणे वाटप व बोंडअळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन

तूर बियाणे वाटप व बोंडअळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात येत्या हंगामामध्ये तूर पिकाची लागवण करण्यासाठी शेतकऱ्यांकरिता तूर पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले.
गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदा चांगली राहणार असल्याचा अंदाज आहे. या वर्षी खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या या नियोजनात भर म्हणून वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राने पाऊल उचलले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१८-१९ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना तूर या पिकाचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. याचबरोबर तूर पिकाचे नियोजन व पद्धती विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनावर डॉ. प्रशांत उंबरकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. कृषी सभापती मुकेश भीसे उपस्थित होते. शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा व पीक व पिकांविषयी माहितीकरिता उपलब्ध शास्त्रज्ञांची मदत घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. धनराज चौधरी, डॉ. रूपेश झाडोदे, उज्ज्वला सिरसाट, अंकिता अंगाईतकर, कांचन तायडे, विशाल उबरहांडे, गजानन म्हसाळ, किशोर सोळंके, समीर शेख, अतुल कांबळे, वसीम खान, सरीता काळे, प्रवीण भुजाडे, शारदा फुलोरकार, गजानन पचारे, रोशन फाले यांनी सहकार्य केले.

Web Title:  Guidance on distribution of tur seeds and bottleneck management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी