‘अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका’ विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:04 AM2018-01-12T00:04:23+5:302018-01-12T00:04:42+5:30
येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय धनवटे होते. व्यासपीठावर नारायण राव, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. रवींद्र सोनटक्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रा. पीटर कुझनिक यांनी अमेरिकचे अणु क्षेपणास्त्राविषयी असलेले धोरण, जगाला अणु क्षेपणास्त्रापासून असलेला धोका, त्यात भारताची भूमिका, अणु क्षेपणास्त्राचे तोटे व जागतिक शांततेत अणु क्षेपणास्त्राची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रा. कुझनिक यांनी इंग्रजी भाषेत दिलेले भाषण महिला महाविद्यालय नागपूरच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मराठीत अनुवाद करून उपस्थितांना समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची प्रा. कुझनिक यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक धारणे यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.