दिशादर्शक फलकाला झुडपांचा विळखा

By Admin | Published: December 27, 2014 10:57 PM2014-12-27T22:57:33+5:302014-12-27T22:57:33+5:30

ग्रामीण भागाला जिल्हाठिकाणासोबत जोडण्याकरिता जोडरस्ते काढले आहेत. या मार्गावर नागमोडी वळण अथवा अंतर दर्शविण्याकरिता दिशादर्शक फलक लावले आहे. वायगावकडे जाणाऱ्या

Guide shooter barks | दिशादर्शक फलकाला झुडपांचा विळखा

दिशादर्शक फलकाला झुडपांचा विळखा

googlenewsNext

वर्धा : ग्रामीण भागाला जिल्हाठिकाणासोबत जोडण्याकरिता जोडरस्ते काढले आहेत. या मार्गावर नागमोडी वळण अथवा अंतर दर्शविण्याकरिता दिशादर्शक फलक लावले आहे. वायगावकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंटचे चबुतरे उभारण्यात आले आहे. प्रत्येक वळणावर तसेच चौरस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा असे चबुतरे आढळतात. मात्र या चबुतऱ्यांना झुडपांचा विळखा असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडते.
बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वायगाव मार्गावरील सिमेंटच्या दिशादर्शकाला झुडूपांचा विळखा असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या दिशासर्शक फलकावर काही सूचना, म्हणी लिहलेल्या असतात. यातून चालकांना योग्य संदेश मिळावा असा उद्देश असतो. मात्र फलकच दिसत नसल्याने चालकांचे दिशाभूल होत आहे.
आष्टा, तळेगाव, वर्धेकडे जायचे असल्यास प्रवाशांना गावातील नागरिकांना विचारणा करावी लागते. संबंधित गाव कुठल्या मार्गावर आहे. कोणत्या दिशेने जावे लागेल, किती किलोमीटर असे प्रश्न विचारणारे अनेकजण आहेत. कारण गावाच्या अंतराबाबत माहिती देणारे फलकच दिसत नसल्याने वाहन चालकांना नागरिकांकडे विचारणा करण्याखेरीज पर्याय नसतो. या मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याचा अदांजच येत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच नवखे प्रवासी यांची अनेकदा दिशाभूल होताना दिसते. ज्या मार्गाने आपण जात आहोत तो मार्ग सदर गावाकडे जाणारा आहे अथवा नाही याचा अदांज अनेकांना येत नसल्याने भलत्याच गावाला पोहचल्याच्या घटना घडतात. याचा मनस्ताप मात्र वाहन चालकाला सहन करावा लागत आहे. येथील काही ठिकाणी सिमेंटचे दिशादर्शक फलक आहेत. यावरील अंतराचा उल्लेख व गावाचे नावच पुसट झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित बांधकाम विभागाने दखल घेऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Guide shooter barks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.