बोर व्याघ्र प्रकल्पातील गाईड संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:31 PM2018-05-15T22:31:11+5:302018-05-15T22:31:11+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनियनने मंगळवारी दुपारपासून संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनियनने मंगळवारी दुपारपासून संप पुकारला.
सेलु तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात जाणाऱ्या पर्यटकांकरिता जिप्सी वाहनावर प्रशिक्षित गाईड नेणे अनिवार्य आहे. आज एका जिप्सीवर गेलेल्या निसर्ग मार्गदर्शक नत्थू सुरजुसे याने वननियमांचे उल्लंघन करीत पर्यटकांना प्रवेशबंदी क्षेत्रात नेल्याची तक्रार एका स्थायी वनमजुराने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली.
शिवाय गाईडला हटकले असता जीवे मारण्याची धकमी दिल्याचाही आरोप आहे. तर गाईड सुरजुसेच्या म्हणण्यानुसार वनमजूर नागोसे हा वनभ्रमंतीच्या वेळी मद्यपान व धुम्रपान करीत असल्याची तक्रार केला आहे. या कारणावरून त्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा आरोप सुरजूसे यांचा आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी तळवेकर यांनी चौकशी न करता एकतर्फी निर्णय घेतल्याचे म्हणत दुपार फेरीपासून सुरजूसेला १४ जून २०१८ च्या दुपार फेरीपर्यंत निलंबनाचे लेखी आदेश दिले.