गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:48 PM2018-08-04T23:48:56+5:302018-08-04T23:49:49+5:30

शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय परिस्थिती आहे याची माहिती कळावी या हेतूने...

Guruji updated the Nutrition Diet | गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख

गुरुजींनी अद्ययावत करावा पोषण आहाराचा अभिलेख

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना : त्रुट्या आढळल्यास कारवाई

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय परिस्थिती आहे याची माहिती कळावी या हेतूने जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी यांनी एक आदेश निर्गमित करून सर्व शिक्षकांना कुठल्याही परिस्थितीत ५ आॅगस्टपर्यंत शालेय पोषण आहार संदर्भातील शाळास्तरावरील अभिलेख अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पत्रानुसार शिक्षकांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदुळ व अन्य धान्याची योग्य प्रकारे साठवण आणि संबंधित नोंदवहीतमध्ये नियमित नोंद घेणे, प्रत्यक्ष साठा व नोंदवहीत नोंदविलेला साठा यामध्ये तफावत नसल्याची खात्री करणे क्रमप्राप्त आहे. शालेय पोषण आहार योजनेसंबंधीची रोखवही व बँक पासबुक अद्ययावत करणे गरजेचे आहे. शिवाय खर्चाच्या पावत्या योग्य पद्धतीने नस्तीबद्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तांदुळ व धान्याचा पुरेसा साठा आहे किंवा नाही, कमी असल्यास तात्काळ शालेय पोषण आहारच्या अधीक्षकांना अवगत करून तात्काळ आवश्यक उपाय-योजना करणे गरजेचे आहे. स्वयंपाक घर मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणारी भांड्याची स्वच्छता ठेवण्याबाबत कळविणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच शिल्लक धान्य योग्य प्रकारे साठविले आहे काय याची शहानिशा करून त्याचा अहवाल सादर करणे क्रमप्राप्त आहे. तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी केली असल्याची खात्री करून घेत त्यांनी वैद्यकीय तपासणी केली नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. शिवाय त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र गोळा करून ते अहवालात नमुद करावयाचे आहे. स्वयंपाकी व मदतनीस यांच्याकडे मुख्याद्यापकांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र आहे की नाही याची शहानिशा करून ते उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त नोंदवहीत असल्याची खात्री करावयाची आहे. विद्यार्थ्यांना पुरक आहार, स्नेहभोजन दिल्याबाबतचीही माहिती ठेवल्याची खात्री करण्यासह विद्यार्थ्यांची उपस्थितीती आॅन लाईन नोंदविणे क्रमप्राप्त आहे. सदर माहितीसह आदी माहिती वेळीच अद्यायवत करून संबंधितांना न पाठविल्यास शिक्षकांवर नियमानुसार कार्यवाही होणार आहे. शिवाय पंचायत राज समितीच्या दौºया दरम्यान ही या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. सदर पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
अवघे काही तासच शिल्लक
जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी अभिलेख अद्ययावत करण्यासाठी रविवार ५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. या पोषण आहार अभिलेखात तुट्या आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: Guruji updated the Nutrition Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.