गावालगत गोठ्यात शिरुन वाघाने केली बैलाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:10 PM2017-12-14T22:10:58+5:302017-12-14T22:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील दसोडा गावात पहाटेच्या सुमारास सुमारात शिरकाव करून गावालगतच्या गोठ्यात शिरुन बैलाला ठार केले. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली.
प्राप्त माहीतीनुसार, दसोडा येथे आज पहाटेच्या सुमारास रामचंद्र डांगे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने बैलाची शिकार केली. शिवाय त्या बैलाला ओढत जंगलात नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ही बाब काही नागरिकांच्या निर्दशनात येताच त्यांनी आरडा ओरडा करीत वाघाला पळविले. वाघाने बैल ठार केल्याने शेतकऱ्याचे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. आधीच शेतकरी आसमानी व सुल्तानी संकटात अडकला असताना वन्य प्राण्यांकडून त्याच्या पिकावर आणि जनावरांवर हल्ले होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरबडे मोडले आहे. दसोडा येथे घडलेल्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात शिरकाव करून वाघाने बैलाला ठार केले. तेव्हा वाघ केव्हा ही गावात येऊन मानसावर हल्ला करू शकतो, असे म्हणत गावकºयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलाच्या शिकारी प्रकरणी शेतकºयाकडून मदतीची मागणी होत आहे.
परसोडी टेंभरी शिवारात गोºह्याचा पाडला फडशा
विरूळ (आकाजी) - टेंभरी परसोडी शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून येथील रूपसिंग पठरे यांच्या एका गोºह्याला ठार मारले. त्यामुळे या शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागात तक्रार दाखल केली असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.