शेतात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:12 PM2017-10-15T23:12:06+5:302017-10-15T23:12:36+5:30

परिसरातीन जंगल क्षेत्रात असलेल्या शेतात जंगली श्वापदांचा चांगलाच हैदोस वाढला आहे.

Hades in the field | शेतात रानडुकरांचा हैदोस

शेतात रानडुकरांचा हैदोस

Next
ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान : कपाशी जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : परिसरातीन जंगल क्षेत्रात असलेल्या शेतात जंगली श्वापदांचा चांगलाच हैदोस वाढला आहे. रानडूकरांच्या कळपाने येथील शेतकरी श्रीराम कोपरकर यांच्या शेतात अक्षरश: हैदोस घालत एक एकर कपाशीचे पीक जमिनदोस्त केले. यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
श्रीराम कोपरकर यांचे केळझर येथे शेत असून चार एकरात कपाशीचे पीक आहे. शनिवारी रात्री रानडुकरांच्या कळपाने शेतात हैदोस घालत कपाशीची उभी झाडे भुईसपाट केली. आज सकाळी शेतकरी कोपरकर शेतात गेले असता त्यांना झालेला प्रकार निर्दशनास आला. याबाबत त्यांनी वनविभागाला तक्रार दिली. सोमवारी सदर नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
नुकसान भरपाईची मागणी
जंगलव्याप्त् भात असलेल्या शेतात रानडुकरांकडून शेतपिकाचे अतोनात नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. यात शासनाकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असून ती शेतकºयांची बोळवण करणारी आहे. यामुळे बरेच शेतकरी झालेल्या नुकसानाची तक्रार वनविभागाकडे करीत नाही. जर शेतकºयांनी झालेल्या नुकसानीची तक्रार केली तर वनविभागाच्या अधिकाºयांकडून कागदपत्रांचा भडीमार करून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार होतो. यामुळे शेतकरी या नुकसानीच्या भरपाईपायीपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Hades in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.