आठवडाभरात विविध घटनांनी हादरला तालुका
By admin | Published: July 28, 2016 12:30 AM2016-07-28T00:30:58+5:302016-07-28T00:30:58+5:30
दोन हत्या, जादूटोण्यावरून नग्न धिंड व मारहाण, अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे व चिमुकल्यांसह मातेने केलेली आत्महत्या या घटना मनाला चटका लावणाऱ्या ठरल्या
आठवडाभरात विविध घटनांनी हादरला तालुका
चिमुकल्यांसह मातेच्या आत्महत्येने गहिवर : जादुटोण्यावरील घटनेने मागासलेपणाचे प्रगटन
सुधीर खडसे ल्ल समुद्रपूर
दोन हत्या, जादूटोण्यावरून नग्न धिंड व मारहाण, अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे व चिमुकल्यांसह मातेने केलेली आत्महत्या या घटना मनाला चटका लावणाऱ्या ठरल्या. आठवडाभरात घडलेल्या या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले. कधी नव्हे त्या लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे तालुका मात्र हादरला.
तालुक्यातील १५०० लोकसंख्या असलेल्या किन्हाळा या गावातील आई पूनमने मुलगी अनुष्का (९), मुलगा तुषार (५) यांना विहिरीपर्यंत सोबत घेऊन जात प्रथम मुलगी, नंतर मुलगा यांना विहिरीत ढकलून नंतर स्वत: विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही जीव गेला. शवविच्छेदनानंतर मृतदेह किन्हाळा येथे नेल्यानंतर एकाच तिरडीवर तिघांचेही मृतदेह ठेवून अंत्ययात्रा निघाली. कोवळी चिमुकली आईसह पाहिल्यानंतर अंत्ययात्रेतील सहभागी नागरिकांचे डोळे पाणावले. हृदय पिळवटून टाकरणाऱ्या या घटनेबाबत अनेकांनी दु:ख व्यक्त केले.
पूनमच्या माहेरच्यांनी नवरा, सासरा, सासू यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली तर बैल सोडण्यासही घरात माणूर राहणार आहे. शेती करणारं कुणी नसल्याने ती बुडणार आहे. एकंदरीत अवचट व उगेमुगे परिवाराची भरून न निघणारी हाणी झाल्याने दोन्ही कुटुंब आजच्या स्थितीत उद्ध्वस्त झाले आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी दुसरी घटना म्हणजे येथील ११ वर्षीय मुलीशी भाजपचा कार्यकर्ता नुरूल्ला खॉ पठाण (६०) याने अश्लील चाळे करीत वियनभंग केला. या नराधमाने पीडिताला आपल्या दुकानात मागील बाजूला घेऊन जात कृत्य केल्याची घटना घडली. तक्रार दाखल करून पाच दिवसांचा कालावधी लोटला; पण पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजात चिड आहे.
याच आठवड्यात माजी जि.प. सभापती छत्रपती थुटे (५०) रा. सावरखेडा यांची हिंसक प्रवृत्तीने हत्या करण्यात आली. यात दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी अद्यापही पोलिसांपासून दूर आहे. तिसऱ्या घटनेत वरोरा येथील व्यवसायी भाऊराव पुनवटकर यांची सावंगी (झाडे) येथे हत्या करण्यात आली. यातील आरोपी जेरबंद करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
कार्यवाही आणि प्रबोधनाचा ससेमीरा
एकाच आठवड्यात घडलेल्या चार घटनांनी सबंध तालुका हादरला असतानाच पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारीही वाढविली. मंगरूळ येथील जादूटोणा प्रकरणाने तर मागासलेपणाचे सादरीकरणच झाले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेतच नव्हे तर प्रशासन व नागरिकांतही खळबळ माजली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस यंत्रणेला मंगरूळ गावातील जादूटोण्याचे भूत उतरविताना चांगलीच कसरत करावी लागली. एकूण या घटनांमुळे कार्यवाही आणि प्रबोधनाचा ससेमीराच पोलीस, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या मागे लागला होता.
मंगरूळ येथे जादूटोणा करण्याच्या कारणावरून इसमाची नग्न धिंड काढण्यात आली तर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मंगरूळ गाठत परिस्थिती हाताळली. अंनिसनेही पुढाकार घेत ग्रामस्थांचे प्रबोधन केले.