अनेक गावांना गारांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:34 PM2018-05-03T23:34:51+5:302018-05-03T23:34:51+5:30

गुरूवारी दिवसभर जिवाची काहीली करणारी ऊन होती. तर सूर्यणारायण मावळतीला जाताना अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह अनेक परिसरात पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाले.

Hail to many villages | अनेक गावांना गारांचा तडाखा

अनेक गावांना गारांचा तडाखा

Next
ठळक मुद्देझाड पडल्याने वाहतूक प्रभावित : तापत्या उन्हापासून दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुरूवारी दिवसभर जिवाची काहीली करणारी ऊन होती. तर सूर्यणारायण मावळतीला जाताना अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह अनेक परिसरात पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाले. आज झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती.
आर्वी तालुक्यात विरूळ येथे वादळीवाºयासह पाऊस झाला. चिकणी व परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी ४.१५ वाजता पासून सुरू झाला. आकोली परिसरातही गारांसह पाऊस झाला. बोरगाव (गोंडी) येथील पुरूषोत्तम मंडारी यांच्या घरावरील टिनाचे शेड वादळी वाºयामुळे उडून गेले. आंजी परिसरातही गारपीटासह पाऊस झाला. येथे बोराच्या आकाराची गार पडली. आर्वी मार्गावरील डोर्ली नजीक रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. चिकणी (जामणी) परिसरात पाऊसामुळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वर्धा शहरासह पिपरी (मेघे) भागात गारपीट झाल्याचे सांगण्यात येते.
वादळी वाºयासह पावसाचे थैमान; शेकडो झाडे उन्मळून पडली
समुद्रपुर - तालुक्यातील काही गावांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेकडो झाडं उन्मळून पडली. या पावसामुळे कुठलीही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाºयासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.
या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर काही गावांमधील नागरिकांना रात्री काळोखातच काढावी लागली.
हिंगणघाट-उमेरड मार्गावर धोंडगाव मुनेश्नरनगर जवळ रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्रूाने वाहतूक खोळबंली होती. याची माहीती मिळताच ठाणेदार महेंद्र ठाकुर, पोलिस कर्मचारी रहीम शेख, रामदास दराळे, नरेद्र बेलखेडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून शर्तीच्या प्रयत्नाअंती खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर पडून आलेले झाड जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला करण्याचे काम सुरू होते. खंडित विद्युत प्रवाहाचा सर्वाधिक त्रास चिमुकल्यांसह वयोवृद्धांना व रुग्णांना सहन करावा लागला.

Web Title: Hail to many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.