‘एल्डर लाइन’चा सव्वा लाख ज्येष्ठांनी घेतला मानसिक आधार; तातडीने मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 06:39 AM2023-05-02T06:39:27+5:302023-05-02T06:39:56+5:30

मानसिक आधारासह तातडीच्या मदतीसाठी १२ तास टोल फ्री हेल्पलाइन

Half a million seniors took mental support from 'Elder Line'; Urgent help | ‘एल्डर लाइन’चा सव्वा लाख ज्येष्ठांनी घेतला मानसिक आधार; तातडीने मदत

‘एल्डर लाइन’चा सव्वा लाख ज्येष्ठांनी घेतला मानसिक आधार; तातडीने मदत

googlenewsNext

महेश सायखेडे

वर्धा - ज्येष्ठांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२१ ला १४५६७ ही हेल्पलाइन (एल्डर लाइन) सुरू केली आहे. हीच एल्डर लाइन आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल सव्वा लाख गरजू ज्येष्ठांसाठी आधारदायी ठरली आहे.

महाराष्ट्रात ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. संबंधित हेल्पलाइन टोल फ्री असून, सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत कर्तव्यावर असलेला कर्मचारी प्रत्येक कॉल स्वीकारून गरजू ज्येष्ठ व्यक्तीला तातडीची मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करतो. दिवसभरातील प्रत्येक कॉल रेकॉर्ड होत असून, सकाळी कर्तव्यावरील कर्मचारी ते ऐकतो. त्यानंतर तातडीने कार्यवाही करीत असल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ व्यक्तीला मानसिक आधार, तातडीने मदत 
हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला कर्तव्यावर असलेला कर्मचारी मानसिक आधार देत आरोग्यविषयक सुविधा, कौटुंबिक छळ प्रकरणात तातडीची मदत, केअर सेंटरद्वारे देण्यात येणारी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.

वर्षभरात चारच सुट्ट्या
हेल्पलाइनद्वारे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षातून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि १ मे या चारच सुट्ट्या मिळतात.

एल्डर लाइन म्हणजेच ज्येष्ठांची राष्ट्रीय हेल्पलाइन. याद्वारे मागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील सुमारे सव्वा लाख ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यात आली आहे. १४५६७ या हेल्पलाइनच्या माध्यमातून ज्येष्ठ व्यक्तीला मानसिक आधार देत आरोग्यविषयक सुविधा, कौटुंबिक छळ प्रकरणात तातडीची मदत, केअर सेंटरद्वारे देण्यात येणारी सुविधा आदी मिळवून दिली जाते - जयदेव नाईक, विश्वस्त व प्रकल्प समन्वयक

Web Title: Half a million seniors took mental support from 'Elder Line'; Urgent help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.