जिल्ह्यात आठ दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे अर्धशतक; तब्बल ४३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 05:00 AM2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:16+5:30

दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर मृत्युसंख्या ५२६ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. एप्रिल रोजी ४२४ कोरोनाबाधित तर सहा जणांचा मृत्यू झाला.

Half a century of corona virus infection in eight days in the district; As many as 43 victims | जिल्ह्यात आठ दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे अर्धशतक; तब्बल ४३ बळी

जिल्ह्यात आठ दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे अर्धशतक; तब्बल ४३ बळी

Next
ठळक मुद्दे३,९११ जण पॉझिटिव्ह : रुग्णसंख्येने ओलांडला २५ हजारांचा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४३ जणांचा कारोनाने बळी घेतला, तर ३ हजार ९११ जणांना कारोनाची बाधा झाली. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत.
गतवर्षीप्रमाणे याहीवेळीमार्च महिन्यापासूनच राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. मागीलवर्षी ९ मे पर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता. जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी आढळून आला. मात्र, रुग्णसंख्या आणि मृत्यूदर आटोक्यात होता. यावेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर मृत्युसंख्या ५२६ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. एप्रिल रोजी ४२४ कोरोनाबाधित तर सहा जणांचा मृत्यू झाला. १० एप्रिलला ४५१ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू, ११ एप्रिलला ५११ पॉझिटिव्ह, दोन मृत्यू, १२ एप्रिलला २५६ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू, १३ एप्रिल-४८१ पॉझिटिव्ह मृत्यू-निरंक, १४ एप्रिल ७५४ पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू, १५ एप्रिल ४५४ पॉझिटिव्ह, ६ मृत्यू, १६ एप्रिलला ५८० जण कोरोनाबाधित आढळले तर पाच जणांचा मृत्यू झाला.
१४ एप्रिलला रुग्णसंख्येचा उच्चांक
गतवर्षीपासून कोरोनाने थैमान घातले असले तरी रुग्णसंख्या आटोक्यात होती. कोरोनाच्या दुसºया लाटेत, आतापर्यंतच्या इतिहासात १४ एप्रिलला सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले. तर मृत्यूसंख्येनेही नवा उच्चांक गाठलेला आकडेवारीवरून दिसून येते.
 

 

Web Title: Half a century of corona virus infection in eight days in the district; As many as 43 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.