आठवड्यात अनलॅाक शाळांचे अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:15+5:30
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या ३५८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यामध्ये २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या सर्व ३ हजार ३०० शिक्षक, कर्मचाºयांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. मात्र, शिक्षकांची संख्या आणि उपलब्ध यंत्रणा यामुळे २३ नोव्हेबरपर्यंत शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होऊ शकल्या नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचे आदेश दिले होते. पण, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य, शिक्षण विभागाचा पाठपुरावा आणि शिक्षक-पालकांनी घेतलेला पुढाकार यामुळे एका आठवड्यात तब्बल ५८ टक्के शाळा सुरु झाल्या असून ऑफलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या ३५८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यामध्ये २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या सर्व ३ हजार ३०० शिक्षक, कर्मचाºयांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. मात्र, शिक्षकांची संख्या आणि उपलब्ध यंत्रणा यामुळे २३ नोव्हेबरपर्यंत शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होऊ शकल्या नाही. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांकडूनही संमती पत्र मिळण्याकरिता प्रारंभी अडचणी गेल्याने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत टप्याटप्याने शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेेक भीमनवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या दिवशी ३५८ शाळांपैकी केवळ ९८ शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दररोज शाळांची संख्या वाढत गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील २०७ शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांची पटसंख्या ३५ हजार ५८० असून सध्या ५ हजार ७६६ विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहत आहे. सर्वच शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची तापमान माजले जात आहे. तसेच शाळांमध्ये निर्जतुकीकरण केले जात आहे. येत्या काही दिवसात आता सर्वच शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली असून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहेत.
६७ शिक्षक कोरानाग्रस्त
जिल्ह्यातील ३ हजार ३०० शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याकरिता तालुका पातळीवर व्यवस्था करण्यात आली होती. १७ नोव्हेंबरपासून चाचणीला सुरुवात झाली असून २६ नोव्हेंबरला सर्वांची चाचणी पूर्ण झाली. यापैकी ६७ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने निदर्शनास आले. त्यामुळे शाळांमध्येही आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे.
जिल्ह्यात ९ ते १२ वी पर्यंंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचे आदेश येताच शिक्षण विभागाकडून तयारीला सुरुवात केली. त्यानुसार मुख्याध्यापकांची बैठक बोलावून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालकांशीही शिक्षकांनी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची विनंती केली. शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि पालकांची मिळालेली साथ यामुळे १ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के शाळा सुरु करण्याचे प्रयत्न आहे.
- डाॅ. मगेश घोगरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
ऑनलाईन सर्वेक्षणात शाळा सुरु करण्यास हाेकार
शाळा सुरु होण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने ऑनलाईन सर्वेक्षण केले. यामध्ये १ हजार २११ विद्यार्थी, ५०५ पालक, ४६२ शिक्षक तर १९२ मुख्याध्यापक सहभागी झाले होते. या २ हजार ३७० प्रतिसादकांपैकी ८१.९ टक्के व्यक्तींनी शाळा सुरु करण्याबाबत होकार दर्शविला आहे. सोबतच शासनाच्या या निर्णयाशी सहमत असल्याचेही त्यांनी सर्वेक्षणातून स्पष्ट केले आहे.