दीड लाखाची विहीर झाली मिनिटभरात भुईसपाट

By admin | Published: September 17, 2016 02:33 AM2016-09-17T02:33:02+5:302016-09-17T02:33:02+5:30

शेतातील कपाशीला ओलीत करण्यासाठी विहिरीवरील मोटारपंप सुरू करताच अवघ्या मिनीटभरात विहीर खचली.

Half a minute, the groundwater in the well | दीड लाखाची विहीर झाली मिनिटभरात भुईसपाट

दीड लाखाची विहीर झाली मिनिटभरात भुईसपाट

Next

पोरगव्हाण येथील प्रकार : अडीच लाखांचे नुकसान
आष्टी (श.) : शेतातील कपाशीला ओलीत करण्यासाठी विहिरीवरील मोटारपंप सुरू करताच अवघ्या मिनीटभरात विहीर खचली. सर्व बांधकाम केलेले क्रॉँक्रीट खचून गेले. हा प्रकार तालुक्यातील पोरगव्हाण येथील छाया सुदाम वाघ यांच्या शेतात घडला. कष्टातून बांधलेल्या विहीर डोळ्यादेखत भुईसपाट झाल्याने शेतकऱ्याला धक्काच बसला आहे.
छाया वाघ यांची पोरगव्हाण शिवारात अडीच एकर शेती आहे. यावर्षी शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली. पीक चांगले बहरले होते. पाऊस नसल्याने कपाशीला ओलीत करण्यासाठी शेतकऱ्याने विहिरीतील मोटारपंप सुरू करताच क्षणार्धात सिमेंट क्रॉँक्रीटने बांधलेली विहीर खचली. बुडापासूनच विहीर उद्ध्वस्त झाली. क्रॉँक्रीटच्या पायऱ्या मोटारपंप, स्टार्टर, पाईपही दबले. सार्वजनिक खांबावरील ताराही तुटल्या. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या मोटारी जळल्या आहेत. यात त्यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमधून मदत देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Half a minute, the groundwater in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.