अर्धवट डागडुजीचा पुलाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:51 PM2018-07-14T21:51:10+5:302018-07-14T21:54:07+5:30

घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे.

Halfway to the repair bridge | अर्धवट डागडुजीचा पुलाला फटका

अर्धवट डागडुजीचा पुलाला फटका

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : एकाच पावसात पुलाला व रस्त्याला भगदाड

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे.
लोकमतमधून ५ मार्चला या पुलाची दुरवस्था समोर आणण्यात आली. पुलाला पडलेले भगदाड व उघड्या पडलेल्या सळाखी बाबतचे वृत्त प्रकाशित करताच निद्रावस्थेत असलेला जि.प. च्या बांधकाम विभागाने एप्रिल महिन्याच्या शेवटी ते भगदाड व उघड्या पडलेल्या सळाखीवर सिमेंट कॉक्रींटचा मुलामा दिला पण जीर्ण अवस्थेत असलेला पुल पाहता व नाल्याला येणाºया पुराचा वेग व प्रवाहाचा अंदाज बांधकाम विभागाने घेतला नसावा असे दिसून येते.
पहिल्याच पुरात या पुलावरून पाणी वाहून गेले आणि पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण केले नसल्याने पाण्याच्या प्रवाहाने वाट काढली त्यामुळे सिमेंट कॉक्रींटच्या मागे पुढे खड्डे पडले यामुळे पुन्हा पूर आल्यास हा रस्ताच बंद होतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जिर्णावस्थेत असलेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची गरज असताना उघड्या पडलेल्या सळाखी झाकण्याचा प्रकार सुरू असल्याने पुलाच्या समोरील रस्ता बंद होऊ शकतो अशी शक्यता आहे.
२० वर्षांपूर्वी केले रस्ता व पुलाचे बांधकाम
घोराड वरून कोलगाव, गायमुख, जूनगड, चौकी, कान्होलीबारा व नागपूरकडे जाणारा हा रस्ता असला तरी घोराड येथील जवळपास शंभराहुन अधिक शेतकऱ्यांचा हा रस्ता आहे .
तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पांदन रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करून डांबरीकरणाचा रस्ता तयार केला सिमेंट पायल्यांचा पुल या नाल्यावर गेली २० वर्षाअगोदर निर्माण केला पण अलीकडे या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने या पुलाची पूर्ननिर्मिती, नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे नव्हे तशी मागणी आहे. बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Halfway to the repair bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.