कोरोनायनात एटीएमवर उपाययोजनांना मूठमाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:02+5:30

संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा फलक कित्येक एटीएमवर सातत्याने झळकत असतो. बंद वातानुकूलित यंत्रांमुळे एटीएम सुरळीत कार्य करीत नाही. विशेष म्हणजे, अनेक एटीएमची दारे सताड उघडी असतात.

A handful of measures at ATMs in Coronay | कोरोनायनात एटीएमवर उपाययोजनांना मूठमाती

कोरोनायनात एटीएमवर उपाययोजनांना मूठमाती

Next
ठळक मुद्देना हॅण्डवॉश, ना सॅनिटायझर : मोजक्याच बँकांत सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यात थैमान घातले असतानाच जिल्ह्यातील एटीएमवर प्रशासनाच्या उपाययोजनांना वाकुल्या दाखविल्या जात असल्याची धक्कादायक बाब रविवारी लोकमत चमूने शहरात केलेल्या पाहणीदरम्यान उजेडात आली.
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या संख्येने एटीएम आहेत. एटीएममध्ये मूलभूत सुविधांचा आधीच दुष्काळ आहे. वातानुकूलित यंत्रे कित्येक महिन्यांपासून बंद असून सुरक्षारक्षक नसल्याने सर्वच एटीएम बेवारस ठरत आहेत. स्वच्छतेचाही थांगपत्ता नाही. अनेक एटीएममध्ये चक्क श्वानांचा राबता असतो. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडते आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढतेच आहे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर आदी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाच्या सूचना असताना शहरातील एकाही एटीएमवर या सुविधा आढळून आल्या नाहीत. दुसरीकडे शहरातील मोजक्यात बँकांत या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधित बँका आणि एजन्सींचा निष्काळजीपणा आगामी काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर घालणारा ठरू शकेल, अशी वास्तविक परिस्थिती आहे. एटीएम म्हणजे आज सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बँकेत जाऊन पैसे काढायचे कष्ट एटीएममुळे बऱ्यापैकी कमी झालेत आणि बँकांमध्ये रांगा लागण्याचे प्रमाणही निम्म्यावर आले.
संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा फलक कित्येक एटीएमवर सातत्याने झळकत असतो. बंद वातानुकूलित यंत्रांमुळे एटीएम सुरळीत कार्य करीत नाही. विशेष म्हणजे, अनेक एटीएमची दारे सताड उघडी असतात. त्यामुळे विरळ भागातील एटीएममध्ये श्वान ठाण मांडून बसलेले असतात. स्वच्छतेचाही अभाव असतानाच कोरोना संक्रमणाच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने धोक्याची घंटा आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना प्रशासनाच्या नियमांशी काही घेणे-देणे नसल्याचेच बँकांच्या बेपर्वाईवरून दिसून येते.

सोशल डिस्टन्सिंगचा ठिकठिकाणी फज्जा
पेन्शनर आणि इतर ग्राहकांची बँकांत व्यवहारासाठी दररोज मोठी गर्दी उसळते. मात्र, बँकांकडून कोरोना नियमांविषयी फारशी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक अंतराचे येथे तीनतेरा होताना दिसतात. याकडेही बँक व्यवस्थापनांचे दुर्लक्ष आहे.

जबाबदारी कुणाची?
शहरातील बहुतांश एटीएममध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न केला जात आहे.

जिल्ह्यात एकूण २२५ एटीएम
जिल्ह्यात एकूण २२५ एटीएम असून राष्ट्रीयकृत बँकांचे १४९ तर खासगी बँकांचे ७६ एटीएम आहेत. शहरातील एकाही एटीएमवर हॅण्डवॉश, सॅनिटायझरची सुविधा आढळून आलेली नाही. सुरक्षारक्षकही नाहीत. वातानुकूलित यंत्रणा बंद, अशा अनेक समस्यांनी विळखा घातलेला असताना बँक व्यवस्थापनांची अनास्था कायम आहे.

बँक कर्मचाऱ्यांना द्यावे सौजन्याच्या वागणुकीचे धडे
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी, सहकारी बँकांची संख्या मोठी आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांत खातेदारांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. याचा सर्वसामान्यांना वेळोवेळी प्रत्यय येतो. या बँकांतील गलेलठ्ठ पगाराचे अधिकारी आणि कर्मचारी मस्तवाल झाले आहेत. आमचे कुणी काहीच बिघडवू शकत नाही, या तोऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचारी वावरत असतात. कोरोना संक्रमणाने थैमान घातले असताना बँक व्यवस्थापने अद्याप निद्रिस्त आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: A handful of measures at ATMs in Coronay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.