स्वच्छ वर्धेसाठी सरसावले हात
By admin | Published: April 10, 2017 01:32 AM2017-04-10T01:32:27+5:302017-04-10T01:32:27+5:30
एकेकाळी स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देत सामाजिक संस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला होता.
नगर पालिकेचा पुढाकार : प्रभाग क्र. १८ व १९ मध्ये स्वच्छता अभियान
वर्धा : एकेकाळी स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देत सामाजिक संस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यास प्रारंभ केला होता. हाच धागा धरत पालिका प्रशासनानेही प्रत्येक रविवारी स्वच्छ वर्धा अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. अभियानाच्या दुसऱ्या रविवारी शहरातील दोन प्रभाग झाडून स्वच्छ करण्यात आले. यात नगर पालिकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.
स्वच्छ वर्धा अभियानाचा दुसरा टप्पा रविवारी प्रभाग क्र. १८ आणि १९ मध्ये राबविण्यात आला. या अभियानाला प्रामुख्याने ज्येष्ठ नेत्रचिकित्सक व राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे व आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. या अभियानांतर्गत दोन्ही प्रभागांमध्ये नाली, गल्ली, खुल्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. कचरा गाड्यांच्या माध्यमातून दूर फेकण्यात आला. नाल्यांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. प्रत्येकाच्या स्वच्छतागृहामध्ये औषधी टाकण्यात आली. शिवाय शौचालयाच्या वेंट पाईपला जाळ्या बसविण्यात आल्यात. नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या अभियाना दोन्ही प्रभागांतील नागरिकांनीही सहभाग घेत स्वच्छता केली. या अभियानामुळे वर्धा शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता खरोखरच मदत होणार असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत होत्या.
स्वच्छ वर्धा अभियानामध्ये नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, आरोग्य सभापती मीना भाटीया, बांधकाम सभापती निलेश किटे, महिला व बालकल्याण सभापती खॉ शबाना परवीन जहीर खॉ, कैलास राखडे, आशिफ शेख, गुंजन मिसाळ, प्रदीप ठाकरे, श्रेया देशमुख, संदीप त्रिवेदी, रंजना पट्टेवार, आशिष वैद्य, प्रतीभा बुर्ले, यशवंत झाडे, राधा चावरे, सुरेश अहुजा, अर्चना आगे, रेणुका आडे, शेख नौशाद शेख रज्जाक, वंदना भुते, वरुण पाठक यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, महिला शहर अध्यक्ष कमला गिरी, चेतना तायडे, हर्ष तिवारी, भाजपा व युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच सुरेश पट्टेवार जनहित मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)