पाणीदार गावासाठी हात श्रमदानाला लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:11 PM2019-05-13T22:11:14+5:302019-05-13T22:11:46+5:30

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. गतवर्षी जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, देवळी तालुक्यातील गावांनी पुरस्कार प्राप्त केले. यंदा या स्पर्धेत जिल्ह्यातील देवळी, सेलू, आर्वी आणि कारंजा या चार तालुक्यांतील २३४ गावे सहभागी झाली आहेत. या गावामध्ये ग्रामस्थ जोमाने श्रमदान करीत आहेत. दुष्काळाशी दोन हात करीत गाव पाणीदार करण्याचा निर्धार स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील नागरिकांनी केला आहे.

Hands of work for a watery village started | पाणीदार गावासाठी हात श्रमदानाला लागले

पाणीदार गावासाठी हात श्रमदानाला लागले

googlenewsNext
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : खांद्याला खांदा लावून ग्रामस्थांचा मोठा सहभाग, आलेय तुफान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. गतवर्षी जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, देवळी तालुक्यातील गावांनी पुरस्कार प्राप्त केले. यंदा या स्पर्धेत जिल्ह्यातील देवळी, सेलू, आर्वी आणि कारंजा या चार तालुक्यांतील २३४ गावे सहभागी झाली आहेत. या गावामध्ये ग्रामस्थ जोमाने श्रमदान करीत आहेत. दुष्काळाशी दोन हात करीत गाव पाणीदार करण्याचा निर्धार स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील नागरिकांनी केला आहे.
आर्वी : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी टाकरखेड येथे रविवारी महाश्रमदानात सामाजिक व राजकीय संघटनेच्या सदस्यांनी गावकऱ्यांसमवेत सहभाग नोंदवून गाव व परिसर पाणीदार करण्याचा निश्चय केला.
महाश्रमदानाकरिता स्थानिक इंडियन रेडक्रॉस सोसायटीने पुढाकार घेऊन श्रमदानाकरिता शहरातील सामाजिक संघटनांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महाश्रमदानाकरिता बचतगट, विविध संघटना, शिक्षण संस्था, पुढे आल्या. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, उडाण महिला मंच, निरंकारी मिशन, माहेश्वरी महिला मंडळ, आर्वी पत्रकार संघटना, माहेश्वरी सेवा संघ, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, स्व. दंतोपंत ठेंगडी स्मृती समिती, रोटरी क्लब, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लॉयन्स क्लब, रामदेवबाबा उत्सव समिती, जिवलग मित्र परिवार, टाकरखेड महिला मंडळ, लॉयन्स क्लब आॅफ आर्वी सेवा, मातृसेवा संघ, माई फाऊंडेशन ग्रामसेवक संघटना, जिजाऊ ग्रुप, भीम संघटना, आदर्श एकल सामाजिक ग्रुप, ठाकरे मित्र परिवार, दत्ताजी मेघे आयुर्वेदिक कॉलेज, वर्धा, समर्थ लहानुजी वारकरी मंडळ, सहयोग फाऊंडेशन, प्रगती महिला बचत गट, टाकरखेडा, करुणा महिला बचत गट टाकरखेडा, पोलीस पाटील संघटना, पोलीस विभाग आर्वी, गौरव जाजू मित्र परिवार, वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा, लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा, ग्रामसेवक संघटना आर्वी, नगरपालिका, संत रघुनाथ महाराज गंगापूर इत्यादी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
महाश्रमदानामध्ये केलेल्या श्रमदानातून जवळपास १००० घन मिटरचे काम पूर्ण झाले. प्रती घनमिटरमध्ये १००० लि. पाण्याचे सिंचन होत असते. आजच्या सर्वांनी एकजूट दाखवून केलेल्या श्रमदानातून १ कोटी लिटर पाणी जमा करून परिसर पाणीदार करण्यासाठी सहकार्य केले.
महाश्रमदानकरिता आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, तहसीलदार पवार, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. अरुण पावडे, दीक्षित, डॉ. श्याम भुतडा, डॉ. सचिन पावडे, अशोक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, रवी मंचानी, डॉ. रिपल राणे, डॉ. प्रकाश राठी, वैभव फटिंग, सुधीर पुरोहित, नीलेश देशमुख, प्राचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रा. अविनाश कदम, डॉ. अभिलाष धरमठोक, सुभाष वºहेकर, अरूण ढोक, प्रा. अभय वर्भे, मनीष श्रावणे, ललित संकलेचा, डॉ. विनय देशपांडे, डॉ. श्रीकांत देशपांडे, श्वेता अग्रवाल, लता अग्रवाल, शिवानी देशपांडे, उर्मीला केला, पुष्पा जाजू, विद्या डागा, सूर्यप्रकाश भट्टड, दशरथ जाधव, सुशील ठाकूर, मिलिंद हिवाळे, सुनील बाजपेयी, अश्विन शेंडे, बाळा सोनटक्के, कटमवार, उदय वाजपेयी इत्यादी तसेच गावकरी व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा कालावधी अखेरच्या टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाणी फाऊंडेशनच्या वतीने मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी आर्वी, देवळी तालुक्यातील गावांना रोख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यातील चार तालुक्यातील तब्बल २३४ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा कालावधी २२ मे पर्यंत, अखेरच्या टप्प्यात आहे. स्पर्धेत सहभागी गावातील प्रत्येकी पाच व्यक्तींना स्पर्धापूर्व प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी गावांमध्ये सद्यस्थितीत जोमाने श्रमदान सुरू असून गाव पाणीदार करण्याचा निर्धार केला आहे. विविध सामाजिक संघटनाही श्रमदानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून आर्थिक मदतीचा ओघही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. दुष्काळाशी लढा देण्याकरिता गावे सज्ज होत आहेत.
देवळीत बंधाऱ्याचा पायलट प्रकल्प
देवळी- केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या वतीने या भागातील सहा ठिकाणी २८ कोटींच्या खर्चातून ब्रिज कम बंधाºयाचा पायलट प्रकल्प उभा राहात आहे. यापैकी ५ बंधारे एकट्या वर्धा लोकसभा क्षेत्रात होत असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासोबतच सर्वदूरपर्यंत पाण्याचा निचरा होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खा. रामदास तडस यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. या भागातील देवळी, जामणी, आसदा, कांढळी, सारवाडी व तिवसा येथे बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. तालुक्यातील भीषण पाणीटंचाई व दुष्काळी भागाचा दौरा करीत असताना खा. तडस यांनी देवळीच्या ब्रिज कम बंधाºयाला भेट देऊन पाहणी केली.
देवळी येथील यशोदा नदीपात्रात ५ कोटींच्या खर्चातून या बंधाºयाचे बांधकाम करण्यात येत आहे. या बंधाºयाला स्वंयचलित गोडबोले गेट असून पूर परिस्थितीत हे गेट स्वत:हून उघडण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पूर परिस्थिती उद्भवल्यास या बंधाºयाचे सर्व गेट आॅटोमॅटीक उघडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वदूरपर्यंत केले जात आहे. येत्या आठ दिवसांत बंधाºयापर्यंत नदी खोलीकरणाचे काम येत आहे. बंधाºयाच्या बांधकामामुळे दीड किलोमीटर अंतरापर्यंत बॅक वॉटर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने नदीच्या दोन्ही भागात घाट बांधून सौंदर्यीकरण करणार असल्याचे तसेच पाण्यातील बोटची व्यवस्था करणार असल्याने खासदार रामदास तडस यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी तडस यांच्यासोबत नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य, न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव, प्रणव जोशी, विपीन पिसे, सौरभ कडू तसेच पदाधिकाºयांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Hands of work for a watery village started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.