हंसराजजी अहिर यांनी घेतली पुलगाव बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:35 PM2018-11-21T14:35:27+5:302018-11-21T14:36:24+5:30
पुलगावजवळच्या सोनेगाव आबाजी येथील पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली व त्यांची चौकशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगावजवळच्या सोनेगाव आबाजी येथील पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली व त्यांची चौकशी केली.
खासदार रामदासजी तडस व जिल्हाध्यक्ष राजेश बकाने
यांच्यासह सर्वप्रथम मंत्र्यांनी मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अपघातातील गंभीर जखमी लोकांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
या प्रसंगी माजी खासदार दत्ताजी मेघे व रुग्णालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी गंभीर जखमी रुग्णांच्या उपचारासंदर्भात माहिती दिली. या प्रसंगी श्री हंसराज अहीर म्हणाले पुलगाव सी.ए.डी. कॅम्प हा देशातला महत्वाचा कॅम्प असून या घटनेची केंद्र सरकारकडून कसून चौकशी करून दोषींवर गंभीर कारवाई केली जाईल व मृतांच्या परिवारांना केंद्र शासन कडून भरीव मदत केली जाईल
यानंतर अहिर यांनी सोनेगाव आबाजी या गावात जाऊन मृतकांच्या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेतली व कॅम्प लगतच्या या गावात बॉम्ब फुटल्यामुळे होत असलेल्या सततच्या समस्यांचीही चर्चा केली
त्यानंतर त्यांनी अपघातस्थळालाही भेट दिली. यावेळी पुलगाव सी.ए. डी. अधिकारी, जबलपूर कॅम्पचे अधिकारी, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पिंगळे व एसडीओ वर्धा, ठाणेदार, ठाकूर व जिल्हाप्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेशजी बकाने यांनी अपघातात दोषी असलेल्या ठेकेदारावर गंभीर कारवाई करून मृतांच्या परिवारांना व जखमींना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी कली