पेंचची बी युक्त माती हनुमान टेकडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:31 PM2018-04-26T22:31:44+5:302018-04-26T22:31:44+5:30

बघता बघता येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वृक्षारोपणाने चर्चेत आलेल्या हनुमान टेकडीवर केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. हा वर्धापण दिन येथे निसर्ग प्रेमी मारुती चितमपल्ली यांच्या सानिध्यात गुरुवारी पार पडला.

Hanuman hill on the soil containing the screw b | पेंचची बी युक्त माती हनुमान टेकडीवर

पेंचची बी युक्त माती हनुमान टेकडीवर

Next
ठळक मुद्देमारूती चितमपल्ली यांच्याकडून मिळाले वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बघता बघता येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वृक्षारोपणाने चर्चेत आलेल्या हनुमान टेकडीवर केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. हा वर्धापण दिन येथे निसर्ग प्रेमी मारुती चितमपल्ली यांच्या सानिध्यात गुरुवारी पार पडला. यावेळी त्यांनी पेंच अभयारण्यातील बी युक्त माती टेकडीवर भेट देत त्याचे टेकडीवर रोपण केले.
यावेळी मारुती चितमपल्ली यांनी टेकडीला एक खास भेट म्हणून पेंच अभयारण्यातील बी युक्त माती ज्यामध्ये वड, पिंपळ, उंबर या देशी झाडांच्या बिया मुबलक प्रमाणात आढळतात. अशी माती भेट म्हणून दिली. त्यांच्याच मार्गदर्शनात त्या मातीची कशी रोपे तयार करता येईल, या संबंधी माहिती देऊन त्याचे रोपण त्यांनी व्हीजेएमच्या सदस्यांकडून करून घेतले. यावेळी चितमपल्ली त्यांनी टेकडीवर कुठल्या प्रकारची झाडे लावायची, कुठली वृक्ष लागवड टाळायची आणि चंदनाचे रोप कसे लावायचे ते सविस्तर सांगितले. त्यांनी हनुमान टेकडीवर केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपण आणि संगोपनाची प्रशंसा केली. त्यांच्या या भेटीमुळे व्हीजेएमच्या सदस्यांना खूप ऊर्जा मिळाली. यावेळी सर्व व्हीजेएमच्या सदस्यांची उपस्थिती होती. सदस्यांनीही मारूती चितमपल्ली यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
आमदारांकडून ९० हजार रुपये देण्याची घोषणा
सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. या तडाख्यात झाडांची निगा राखण्याकरिता व्हीजेएमच्या सदस्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. याककरिता व्हीजेएमचे सदस्य अजय वरटकर यांनी आ. डॉ. पंकज भोयर यांनी या प्रोजेक्टकरिता रक्कम मागितली. यावर आ. डॉ. भोयर यांनी त्यांच्या निधीतून ९० हजार रुपये या प्रकल्पाकरिता दिले आहे. यातून वृक्षसंवर्धनाला मदत होईल. आमदारांनी केलेल्या या मदतीतून टेकडी परिसरात असलेली व व्हीजेएमने लावलेली झाडे जगविण्याकरिता मोठी मदत होईल, अशा प्रतिक्रीया वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांनी दिली आहे.

Web Title: Hanuman hill on the soil containing the screw b

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.