वन्य प्राण्यांकडून ऊस पिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:43 PM2018-07-01T23:43:10+5:302018-07-01T23:44:05+5:30
परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
मौजा डोरली शिवारात अशोक नरबरिया याचे शेत आहे. त्यांनी पावणे दोन एकरात ऊसाची लागवड केली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, सदर शेतात रानडुक्करांच्या कळपाने रात्रीच्या सुमारास घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. सुमारे एक एकरातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुक्करांनी केले असल्याचे शेतकरी सांगतो. उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी अशोक नरबरिया यांचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. ते उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागतो. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे योग्य कार्यवाहीची गरज आहे.
उभ्या पिकाचे नुकसान
तळेगाव(श्या.पं.) - काही शेतकऱ्यांच्या शेतात नुकत्याच पेरण्या आटोपल्या. त्यापैकी बऱ्याच शेतात पीकही अंकुरले आहे; पण वन्य प्राणी अंकुरलेल्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. पिकांवर रोही, बंदर आदी वन्य प्राणी ताव मारत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.