अंधश्रद्धा समाजासाठी घातकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:13 PM2018-01-13T23:13:18+5:302018-01-13T23:13:27+5:30
देशाला पूढे जायचे असेल तर समाज प्रयत्नवादी असणे गरजेचा आहे; पण आज दैववादाचे स्तोम वाढविले जात आहे. यातून अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे. अंधश्रद्धा समाजासाठी घातकच आहे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाला पूढे जायचे असेल तर समाज प्रयत्नवादी असणे गरजेचा आहे; पण आज दैववादाचे स्तोम वाढविले जात आहे. यातून अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे. अंधश्रद्धा समाजासाठी घातकच आहे, असा सूर युवा जागृती अभिमान २०१७-१८ अंतर्गत अ.भा. अंनिस व रा.से.यो वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावक्तृत्व स्पर्धेच्या वर्धा जिल्हास्तरीय अंतिम फेरीत युवादिनी उमटला.
गो.से. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज विषयावर आयोजित महावक्तृत स्पर्धेच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत ही तरुणाई वेगळे दाखले देत, वैविध्यपूर्ण वक्तृत्व शैली वापरत बेधडक बोलत होती. या स्पर्धेत सुनील सुर्वे अनिकेत महाविद्यालय वर्धा हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय निहाल मून न्यू आर्टस कॉलेज वर्धा, तृतीय क्रमांक वैष्णवी कोठारे दिपचंद चौधरी ज्युनिअर कॉलेज सेलू यांनी पटकाविला. मधुरा मुळे गो.से. वाणिज्य महाविद्यालय वर्धा हिला विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज विषयावर वर्धा, नागपूर, भंडारा या तीन जिल्ह्यांत महाविद्यालय- तालुका-जिल्हा अशा तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. युवादिनी तीनही जिल्ह्यात अंतिम फेरी घेण्यात आली असून वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचे उदघाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा जादूटोणा विरोधी कायदा दक्षता अधिकारी पराग पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल बारी तर अतिथी म्हणून सेलूचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के, संजय इंगळे तिगावकर, अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, राज्य युवा संघटक पंकज वंजारे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाणे, महिला संघटक प्रा. सुचिता ठाकरे, प्रा. किशोर वानखेडे, तालुका संघटक रवी पुणसे, मोहित सहारे, स्पर्धा संयोजक आशिष नंदनवार तथा तालुका युवा संघटक उपस्थित होते.
महावकृत्त्व स्पर्धेतील दुसºया फेरीतून तालुका स्तरावरून प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते सुनील सुर्वे, प्रिया वाडेकर, निहाल मून, मधुरा मुळे वर्धा, शुभम सोरते, ज्योती डफ, सोनम मेंढे समुद्रपूर, संकेत जगदाळे, साक्षी पाटील, मदिमा इक्तिकर आर्वी, नीलिमा कांबळे, कोमल गोमासे, निपील ढोरे, सुरेश घायवट देवळी, वैष्णवी कोठारे, स्वप्ना ढाले, कोमल माहुरे, समीक्षा लटारे, सागर हलगे सेलू, प्रज्वल कडू, कोमल खवशी, कांचन बसेने, चेतन डोंगरे कारंजा, निकीता बोंद्रे, स्वाती टिपले, दर्शन तळहांडे आष्टी हे तालुकास्तरावरून जिल्हास्तरासाठी पात्र ठरले होते.
दोन महिने या स्पर्धेच्या प्रथम व द्वितीय फेरी विविध महाविद्यालयात घेण्यात आल्याने जनमानसात उत्सुकता वाढली होती. स्पर्धकांसाठी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. किशोर वानखेडे, निलेश गुल्हाणे यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना वर्धा स्मशानभूमीत होळी पौर्णिमेला लोकजागर होलिकोत्सवात पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. संचालन अ.भा. अंनिस गो.से. वाणिज्य महाविद्यालय शाखा सचिव खुशाल भट यांनी केले तर आभार वर्धा ता. संघटक रवी पुणसे यांनी मानले. स्पर्धेला भूषण मसने, अमय पिसे, अभिजीत निनावे, स्नेहल भुजाडे, अजय वरवाडे, अक्षय चेके, प्रफूल्ल प्रधान, आशिष मोडक, सतीश इंगोले, प्रशांत नेपटे, आकाश जयस्वाल, अजय इंगोले, विद्या राईकवार, दादा मून, प्रा. एकनाथ मुरकूटे, प्रा. वैभव पिंपळे, प्रा. अभिजीत पाटील, राजकुमार तिरभाने आदींनी सहकार्य केले.