‘तो’ स्तंभ होणार नवीन
By Admin | Published: September 20, 2015 02:39 AM2015-09-20T02:39:10+5:302015-09-20T02:39:10+5:30
स्थानिक पं.स. कार्यालयासमोर असलेल्या संविधान लिहिलेल्या स्तंभाची दुरावस्था झाली होती.
लोकमतचा प्रभाव
सेलू : स्थानिक पं.स. कार्यालयासमोर असलेल्या संविधान लिहिलेल्या स्तंभाची दुरावस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. वृत्त उमटताच त्या स्तंभाच्या डागडुजी कामास प्रारंभ झाला.
सकाळी कार्यालय सुरू होताच प्रभारी गटविकास अधिकारी यांनी प.स. च्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला. त्या विभागाने स्तंभाची दुरूस्ती करण्यासाठी कारागिराला बोलविले; पण संविधान लिहिलेला संगमवरी दगड अलग काढताच तो स्तंभ हालण्यास सुरूवात झाली. तो कधीही कोसळून पडू शकतो, अशी स्थिती आहे. ही बाबत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आली. यामुळे तो स्तंभ पूर्णत: काढून नव्याने बांधकाम करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सोमवारपासून त्या स्तंभाचे नुकनीकरण करण्याचा निर्णय घेतला, असेही प्रभारी गटविकास अधिकारी एम.एस. सडमाके यांनी सांगितले.
लोकमतमध्ये वृत्त पाहताच मी अभियंत्याला फोन केला. नुकताच पदभार घेतला, असे सांगितले; पण कित्येक महिन्यांपासून स्तंभाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(शहर प्रतिनिधी)