विरूळ येथे आरोग्य चमू दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:24 PM2018-07-09T22:24:12+5:302018-07-09T22:24:36+5:30
येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरमठोक यांच्या चमुने विरूळ गाव गाठून मृतकाच्या कुटुंबियांकडे बालिकेच्या मृत्यूची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरमठोक यांच्या चमुने विरूळ गाव गाठून मृतकाच्या कुटुंबियांकडे बालिकेच्या मृत्यूची माहिती जाणून घेतली.
पठाडे यांच्या कुटुंबियांशी यावेळी सदर चमुतील अधिकाऱ्यांनी विविध विषयी चर्चा केली. तसेच गावात कुणी आजारी व्यक्ती आहेत काय? याचीही माहिती आरोग्य विभागाच्या चमुने जाणून घेतली. यावेळी प्रत्येक घरी जाऊन आजारी व्यक्तीबाबत माहिती घ्या, अशा सुचना आरोग्य कर्मचाºयांना केल्या. तसेच गावातील पाण्याचे नमुनेही घेतले. गावात कुठे पाणी साचून आहेत काय, याबाबत माहिती जाणली. तसेच लवकरच गावात धुळफवारणी करण्यात येईल, अशी माहिती डॉ. गहलोत लोकमतशी बोलताना दिली. आरोग्य विभागाचे विरूळच्या या घटनेकडे पूर्ण लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
गत वर्षी विरूळ गावात डेग्यूच्या आजाराने सचिन देवतळे यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यागावात स्वच्छतेकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष असल्याने दरवर्षी डेग्यू व सदृष्य आजाराने अनेक लोक आजारी पडतात. त्यात काहींना आपला जीव गमवावा लागतो. स्वच्छतेकडे ग्रा. पं. ने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.