उन्ह तापताच कुलर दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:16 PM2018-03-22T22:16:31+5:302018-03-22T22:16:31+5:30

साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे.

He started the cooler repair as soon as possible | उन्ह तापताच कुलर दुरूस्ती सुरू

उन्ह तापताच कुलर दुरूस्ती सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देपारा वाढतोय : फायबरच्या हलक्या कुलरला ग्राहकांची पसंती

ऑनलाईन लोकमत
वर्धा : साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे. यामुळे आतापासूनच घरोघरी कुलर लावण्याला वेग आला आहे. तसेच शहरात सर्वत्र कुलर दुरुस्ती व विक्रीची दुकाने दिसत आहे. सोबतच कुलरसाठी लागणारा वाळाही विक्रीस आला आहे.
सध्या उकाडा जाणवण्यास प्रारंभ झाला आहे. दुपारी फॅनच्या हवेत घरी राहणे असह्य होऊ लागले आहे. यामुळे सुटीच्या दिवशी जो-तो ठेवलेला कुलर काढून तो बसविण्याची धडपड करीत असल्याचे दिसते. यंदा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस आला नाही. उकाडाही लवकरच जाणवायला लागला. यामुळे मार्चच्या उत्तरार्धात वा एप्रिल महिन्यात बाहेर निघणारे आता फेबु्रवारीचा उत्तरार्ध तथा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काढण्याची कामे सुरू झाली आहे. कुलरच्या किमती दरवर्षीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करताना दिसतात. शिवाय अनेक जण स्वस्तातील एसी घेण्यासही पसंती देत असल्याचे दिसून येते. हकल्या फायबरच्या कुलरलाही पसंती मिळताना दिसते.
वर्षभर अडगळीत पडून राहिल्याने बिघाड
पावसाळा सुरू झाला की कुलरची त्या वर्षापूरती गरज संपते. अशावेळी तो कुलर पूर्णपणे मोकळा करून व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते; पण अनेक जण कुलर अडगळीत तसास ठेवून देतात. परिणामी, उन्हाळ्यात कुलर सुरू करण्याची वेळ आली की त्यामध्ये हमखास बिघाड येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. अनेकदा तर त्याचे नट गंजल्याचे दुरुस्ती करणेही कठीण जाते. त्यामुळे नागरिकांना दुरुस्तीच्या ठिकाणी नेऊन कुलर दुरुस्त करून घ्यावा लागतो. नवीन वाळा टाकणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे ते देखील वाळा टाकण्यासाठी कुलर दुकानांमध्ये घेऊन जाताना दिसतात. परिणामी, सध्या शहरात अनेक ठिकाणी कुलर दुरुस्तीची लगबग सुरू असल्याचे दिसते.
अनेकांना मिळतोय रोजगार
अनेकांच्या कुलरमधील मोटरमध्ये बिघाड येतो. तसेच इलेक्ट्रिक फिटिंगही करावी लागते. यासाठी कारागिरांची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करीत असलेल्या कारागिरांना चांगला रोजगार मिळतो. शिवाय कुलरचे टबही जंगत असल्याने ते खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा अधिक असतो. यामुळे टब बनविण्याच्या रोजगारातही वाढ होत असल्याचे दिसून येते.

लाईट वेट कुलरला मागणी
हलके व आकर्षक असे फायबरचे कुलर घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. कमी पाण्यात अधिक वेळ परिसर थंड करण्याची क्षमता या कुलरमध्ये असते. यामुळे त्यांना पसंती मिळत आहे. अनेकांच्या घरी बाहेरून कुलर लावायला जागा नसते. अशा वेळी असे कुलर घरात लावता येत असल्याने सोयीस्कर ठरतात. ते एका जागेवरू न दुसरीकडे सहज हलविता येतात. सोयीच्या दृष्टीने असे कुलर घेतले जात आहेत.

एसीची मागणीही वाढली
आधी एसी हा शब्द जरी उच्चारला तरी तो किती महाग आहे, असा विचार नागरिकांच्या मनात डोकावत होता. शिवाय उन्हाळ्यात वाढीव वीज बिलाचा आधीच नागरिक धसका घेत असत; पण काही वर्षांत तांत्रिक वस्तूंच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आहेत. नवनवीन कंपन्या अत्यल्प व्याजदरात किस्तीवर एसीसारख्या वस्तू देत असल्याने नागरिकांचा एसी घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

खोल्यांवर कुलर लावण्याची लगबग
शहरात बाहेर गावाहून शिकायला येत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. अनेक विद्यार्थी भाडेतत्त्वावर खोली करून एकत्र राहतात. मार्च, एप्रिल व मे हे तीनही महिने परीक्षांचे असतात. अशावेळी गर्मीत अभ्यास करणे असह्य होते. यामुळे विद्यार्थ्यांची खोल्यांवर कुलर लावण्याची घाई असते. यंदा फेबु्रवारीतच विद्यार्थी कुलर बाहेर काढताना दिसून येत आहेत.

Web Title: He started the cooler repair as soon as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.