नगराध्यक्षासह मुख्याधिकारी पोहोचले उपोषण मंडपात

By admin | Published: September 24, 2016 02:12 AM2016-09-24T02:12:22+5:302016-09-24T02:12:22+5:30

नगर पालिकेच्या रस्त्यांवर असलेले प्लास्टिक खाल्ल्यामुळे एकूण १७ जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप

The head office was reached with the gate of the fasting room | नगराध्यक्षासह मुख्याधिकारी पोहोचले उपोषण मंडपात

नगराध्यक्षासह मुख्याधिकारी पोहोचले उपोषण मंडपात

Next

उपोषण सुरूच : मंडपात गावकऱ्यांची गर्दी
सिंदी (रेल्वे) : नगर पालिकेच्या रस्त्यांवर असलेले प्लास्टिक खाल्ल्यामुळे एकूण १७ जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चंद्रशेखर बेलखोडे याने दोन दिवसांपासून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाची दखल घेत नगराध्यक्ष सुनिता कलोडे, उपाध्यक्ष अशोक कलोडे व मुख्याधिकारी रवींद्र ढाके यांनी शुक्रवारी उपोषणकर्त्याची भेट घेतली. यावेळी पालिकेने उपोषण सोडविण्याऐवजी उपोषणकर्त्याला उपोषण नियमबाह्य असल्याचे पत्र दिले. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
या उपोषणाची माहिती तालुक्यात पसरत असून येथे अनेकांकडून भेटी देणे सुरू झाले आहे. शुक्रवारी उपोषण मंडपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, पालिकेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, नगरसेवक रामअवतार तूरकयाल, सुधाकर वल्केयांनी भेट देत चर्चा केली. चंद्रशेखर याने गुरुवारपासून पालिकेसमोर जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषण तोडग्याऐवजी कारवाईचे पत्र
सिंदी(रेल्वे) : पालिकेच्यावतीने उपोषकर्त्याला दिलेल्या पत्रानुसार आपले उपोषण नियमबाह्य आहे, आपण आपल्या सोबत गाई व वासरू उपोषणस्थळी उभे केले आहे. त्यामुळे पालिकामध्ये येणाऱ्यांना व शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना अडचण होत असल्याने आपण आपले उपोषण मागे घ्यावे. यातून कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे.
सदर उपोषण सोडविण्याबाबत तोडगा काढण्याऐवजी पालिका प्रशासनाने असे पत्र देऊन बेरोजगार युवकाच्या जखमेवर मीठ चोळण्याची चर्चा पालिकेच्या अवारात आहे. त्यामुळे न.प. प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरूद्ध जनमाणसात संतापाची भावना आहे. विजय जयस्वाल यांनी मृत गायींची नुकसान भरपाई मिळवून व दोषीवर कार्यवाही करण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन यावेळी दिले. या उपोषणस्थळी मोठ्या संख्येने गावकऱ्यांचा पाठींबा मिळत असून उपोषण स्थळी शेकडो संख्येने गावातील नागरिकांचे लोढेंचे लोंढे भेटी देण्यास येत आहे. शुक्रवारी या मंडपाला यांनी भेट दिली.(वार्ताहर)

Web Title: The head office was reached with the gate of the fasting room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.