संकट समयी आरोग्य विभागाची ‘वॉर रुम’ झाली पुन्हा ‘ॲक्टिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:00 AM2022-01-05T05:00:00+5:302022-01-05T05:00:00+5:30
प्रभागनिहाय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज कोरोना रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असून त्यानुसार प्रत्येक टीमचे सदस्य रुग्णांचा शोध घेत आहेत. यात हायरिस्क, लोरिस्क पेशंट असे दोन प्रकार आहे. ज्यांना डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा गरोदर महिलांना टेस्टिंगसाठी सेंटरवर पाठविण्यात येत आहे. तर लोरिस्क रुग्णांना कोविड विषयी माहिती देण्यात येते व तपासणी करण्यास सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात गांभीर्याने पावले उचलली जात आहे. ओमायक्राॅनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असताना जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जातो आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात असलेली ‘वॉर रुम’ पुन्हा ‘ॲक्टिव्ह’ झाली. दररोज ५० ते ६० कॉल्स येत असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे..
प्रभागनिहाय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज कोरोना रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असून त्यानुसार प्रत्येक टीमचे सदस्य रुग्णांचा शोध घेत आहेत. यात हायरिस्क, लोरिस्क पेशंट असे दोन प्रकार आहे. ज्यांना डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा गरोदर महिलांना टेस्टिंगसाठी सेंटरवर पाठविण्यात येत आहे. तर लोरिस्क रुग्णांना कोविड विषयी माहिती देण्यात येते व तपासणी करण्यास सांगितले जात आहे. आरोग्य विभागात असलेल्या वॉररुममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांच्या मार्गदर्शनात चार अधिकारी वॉच ठेवून आहेत. परिसरातील ज्यांना कोरोना झाला त्या परिसरात क्षेत्रीय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना सांगितल्यावर रुग्णवाहिकेने उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. कमी त्रास असणाऱ्यांना होम क्वारंटाईन केले जाते. दिवसभरात वॉर रुममध्ये ६० वर जास्त जणांशी संपर्क होतो. तसेच यादी रोजच्या रोज अपडेट होते.
माहिती घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक...
- आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. या सर्व वॉर रुमचा आढावा घेतला असता याचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. मात्र, नागरिकांचे पत्ते शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.
कॉलिंगसाठी चार अधिकारी कार्यरत...
- रुग्णांचा नमुना समजल्यानंतर त्वरित पॉझिटिव्ह रुग्णाला वाॅर रुममधून फोन केल्या जातो व त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यास प्रथम विलगीकरणात दाखल केले जाते. घशात खवखवतेय...डोकं दुखतेय... तोंडाला चव नाही...आदी विविध समस्या वॉर रुममध्ये नागरिक संपर्क करुन बोलून दाखवत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वॉर रुममधून दोन्ही चाचण्या नमुने घेऊन रिपोर्टनुसार रुग्णांशी संपर्क साधून पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाते.या कामकाजासाठी ४ अधिकारी कॉलिंगसाठी नियुक्त करण्यात आले आहे. दररोज ५० च्या आसपास नागरिकांशी संपर्क केला जातो आहे.
डॉ. प्रभाकर नाईक, तालुका आरोग्य अधिकारी.