आरोग्य कर्मचाऱ्यांनो एकजूट राहा
By admin | Published: December 30, 2014 11:42 PM2014-12-30T23:42:48+5:302014-12-30T23:42:48+5:30
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा
अरुण खरमाटे : जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अधिवेशन
वर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांनी मांडले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद सभागृह सभागृहात आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा अधिवेशन पार पडले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश माळी यांनी केले. यावेळी सुजाता कांबळे, विजय जांगडे, रतन बेडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलिनी उबदेकर आदी उपस्थित होते. शासन इतिवृत्तानुसार मंजूर केलेल्या सर्व मागण्याबाबत आदेश निर्ममित करण्याबाबत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करून वेतन त्रुटी दूर करणे, डॉ. खानंदे समितीच्या अहवालानुसार कारवाई करणे, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती देण्याकरिता आरोग्य पर्यवेक्षकांच्या ज्येष्ठता याद्या करण्याचे निर्देश मा. आयुक्तांना देण्यात यावे, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतनानुसार १५ हजार रुपये देण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मंजूर मुख्य लेखाशिर्ष २२११ कु. कल्याण २२१० पटकी नियंत्रण प्रतिबंधक योजनेतील मंजूर पदे त्वरित भरा, कुष्ठरोग तंत्रज्ञ यांना आश्वासित कालबद्ध पदोन्नती व अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देण्यात यावी, आरोग्य कर्मचारी संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, एन.आर.एच.एम. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून सेवा सोयी लागू करावी आदी मागण्यांवर यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव सिद्धार्थ तेलतुबंडे यांनी केले. संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व सचिव सुरेश माळी, वसंत बाचलकर, अशोक वाघ यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या १५ दिवसात निकाली न निघाल्यास कठोर पावले उचलली जातील असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
संचालन उदय साळवे यांनी केले. आभार प्रभाकर सुरतकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता निलेश साटोणे, श्याम जीवतोडे, प्रकाश मुरमे, विकास माणिकमुळे, सोमेंद्र कांबळे, भीम खुडे, सुरेश ताकसांडे, अतुल शेंडे, दिलीप धुडे, जोशी कांबळे, श्याम जोशी भगत, चंद्रकांत वाघुले, प्रशांत आदमणे, साधना रामटेके, शाले कौरती, लता भगत, लीना चौधरी, ए.व्ही.सहारे, एस.एन. वीरपाते, वंदना गराड, जिजा नेहारे, मंदा शर्मा, विठ्ठल केवटे, राजेंद्र धरमठोक, चंद्रशेखर वरकड, डगवार, यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी )