वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस; लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले
By अभिनय खोपडे | Updated: August 20, 2023 09:24 IST2023-08-20T09:23:41+5:302023-08-20T09:24:02+5:30
लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे.

वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस; लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले
वर्धा : जिल्ह्यात रात्रीपासून संततदार पाऊस सुरू असल्याने लालनाला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. अनेक मार्ग बंद पडले आहे.
लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता आज २० आँगस्ट रोजी सकाळी ७ वाजता धरणाचे ५ दरवाजे ३० से.मी.ने उघण्यात आले आहे. धरणातून विसर्ग ९२.५७ घनमीटर प्रती सेकंद (३२६९ घन फिट प्रती सेकंद) ईतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
वर्धा तालुक्यातील मदणी येथील धाम नदीवरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता सद्या वाहतूकीस बंद आहे. वर्धा तालुक्यातीलच करंजी भोगे ते पुजई, पवनी, सोंडलापुर मार्ग पुरामुळे वाहतुक बंद आहे.