जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 05:00 AM2022-06-25T05:00:00+5:302022-06-25T05:00:13+5:30

हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Heavy rains are not expected in the district for another five days | जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

जिल्ह्यात आणखी पाच दिवस दमदार पावसाची शक्यता नाहीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सकाळी एक मजकूर जाहीर करीत विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची कशी स्थिती राहील याबाबतची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या मजकुरातून  पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ ते २८ जून या काळात ढगांच्या गडगडाटासह चकाकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाल्याचे बोलले जात असले तरी पुढील पाच दिवस वर्धा जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात ५६४.१७ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर मध्यंतरी जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी झाल्याने मोसमी पाऊस आला, असा अंदाज बांधत तब्बल ४२ हजार ६९४ हेक्टरवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. तर आता पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

सप्टेंबरपर्यंत पडतो ६६७०.८४ मिमी पाऊस
- वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी सुमारे ६६७०.८४ मिमी पाऊस पडतो. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५६४.१७ मिमी इतकाच पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तर आता पुढील पाच दिवस जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता नसल्याने अंकुरलेले पीक करपण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे ओढवणार संकट
- जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पीकही अंकुरले आहे. पण अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढवणार आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उभ्या पिकांना ठिबक किंवा तुषारने सिंचन करावे. शिवाय पिकाला डवरणी करावी. तसेच कुठली अडचण येत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

Web Title: Heavy rains are not expected in the district for another five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस