हेल्मेट वापर मोहीम गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:35 AM2018-11-18T00:35:45+5:302018-11-18T00:36:18+5:30

सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या आहे. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धेत तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात हेल्मेटच्या वापराबाबत जनजागती करीत हेल्मेट वापर क्रमप्राप्त करण्यात आले; ...

Helmet usage campaign was thwarted | हेल्मेट वापर मोहीम गारठली

हेल्मेट वापर मोहीम गारठली

Next
ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणीत एसपींची सूचना ठरतेय ‘शनी’गत अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या आहे. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धेत तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात हेल्मेटच्या वापराबाबत जनजागती करीत हेल्मेट वापर क्रमप्राप्त करण्यात आले; पण पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. तसेच वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच हेल्मेट विषयीची वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली वर्धेत नियुक्त झाल्यानंतर तेही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नसल्याचे बोलले जात असल्याने वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सुजान नागरिक बोलतात.
न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धेत हेल्मेट वापराविषयी जनजागृती करताना व त्याची अंमलबजावणी करताना सुरूवातीला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त करण्यात आला होता. त्याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी पुढाकार घेत एक लेखी पत्रही काढले होते. त्यानंतर तरुण-तरुणींसह नागरिकांमध्ये हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली. शिवाय प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटचा वापर कशासाठी करावा हे पटवून देत हेल्मेटचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते हे पटवून देण्यात आले.
सुरक्षीत प्रवासासाठी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर आवश्यक असल्याचे तज्ज्ञही सांगतात. तरी पोलीस अधीक्षकांची खांदेपालट होताच तसेच नवीन पोलीस अधीक्षकांकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी वर्धेला येण्यापूर्वी देण्यात आलेल्या हेल्मेट वापराविषयीच्या सूचनांमुळे वाहतूक पोलिसांकडून पूर्वी राबविण्यात येणारी सदर मोहीम बारगळल्याचे चर्चा होत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक चांदे यांच्या अवघ्या काहीच महिन्यांच्या कार्यकाळात वर्धेतील वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज असून तशी मागणीही आहे.
नो-पार्किंगच्या नावाखाली वाहनांची उचल
वर्धा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक पोलीसांकडून कुठलीही सहानुभूती न दाखविता नो-पार्कींगमध्ये वाहन उभे केल्याचे कारण पुढे करून थेट वाहने उचलून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेत नेली जात आहेत. शिवाय वाहनचालकांकडून कारवाईचा धाक दाखवून दंड वसूल केला जात आहे. ज्या परिसरात रस्त्याच्या सिमेंटीकरणाची काम सुरू आहे त्याच भागातून नो-पार्कींगचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक दुचाकी वाहने ताब्यात घेतली जात आहेत, हे विशेष.
१५ चालानचे टार्गेट?
वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शहरातील विविध भागात दररोज वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपले काम व्यवस्थित आणि प्रामाणिकतेने करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, सध्या एका पॉर्इंटवरील कर्मचाऱ्यांना दिवसभऱ्यात कमीत कमी १५ चालान नागरिकांना देण्याच्या सूचनाच दिल्या असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.

हेल्मेट वापराविषयीची मोहीम ही सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीेने महत्त्वाची आहे. अधिकारी बदले असले तरी ही मोहीम ठप्प पडली असे म्हणता येणार नाही. हेल्मेटचा वापर हा नागरिकांसाठी फायद्याचा असून लवकरच पुन्हा नव्या जोमाने हेल्मेट वापर व जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे.
- निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

तत्कालीन एसपी निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे तत्कालीन एपीआय गुरव यांनी हेल्मेट वापर विषयी जनजागृतीचे चांगले काम केले; पण गुरव यांची तेथून बदली झाली. तर पोलीस अधीक्षकांचीही खांदेपालट झाली. सध्या हेल्मेट विषयीची मोहीम बारगळली आहे. ती नव्या जोमाने राबविणे आवश्यकच आहे.
- विकास दांडगे, शहर प्रमुख,
प्रहार, वर्धा.

हेल्मेट वापर व जनजागृतीची वाहतूक पोलिसांची मोहीम सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची होती. ती कुठल्या कारणाने बंद आहे हे न उलगडणारे कोड आहे. वर्धेत सिमेंट रस्ते तयार होत असून अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहे. काही रस्ता अपघातात हेल्मेटमुळे प्राण वाचले आहे. त्यामुळे ही मोहीम गरजेची आहे.
- निहाल पांडे, अध्यक्ष,
युवा परिवर्तन की आवाज, वर्धा.

Web Title: Helmet usage campaign was thwarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.