गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:09 PM2018-02-19T22:09:03+5:302018-02-19T22:09:21+5:30
जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाने भरपाईपोटी तुटपुंजी मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असून तीन वर्षात शासनाने ज्या-ज्या घोषणा केल्या, त्या सर्व फोल ठरल्या. आजपर्यंत शेतकºयांना मदतच झाली नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. शेतकºयांच्या विजेचे १०० टक्के बिल माफ करावे, अल्पभूधारक वयोवृद्ध शेतकऱ्यांना मासिक १० हजार रुपये मानधन द्यावे, ठिंबक व तुषार सिंचनाचे रखडलेले अनुदान त्वरित द्यावे, नव्याने १०० टक्के अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन योजना लागू करावी, चालू वर्षातील पीक कर्ज माफ करावे, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, पांडूरंग देशमुख, मनोज चांदुरकर, मोहन शिदोडकर, संदीप सुटे, धैर्यशिल जगताप, बाबाराव निवल, अमित गावंडे, हरिभाऊ नाखले, अक्षय पाटील, हेडाऊ आदी उपस्थित होते.