आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:38 AM2018-03-13T00:38:05+5:302018-03-13T00:38:05+5:30

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

Helping families of five suicidal farmers | आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

Next
ठळक मुद्दे‘आस्था’चा उपक्रम : शिलाई मशीनसह गाय व शेळ्या वितरित

आॅनलाईन लोकमत
वर्धा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. घरातील कर्त्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. अशा नाजूक परिस्थितीत सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबियांना गाय, शिलाई मशीन व शेळ्या वितरित करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आशीष गुलवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, डॉ. नितीन जसवंते, बंडू कडू, विलास माहूरे, अ‍ॅड. भाऊसाहेब भांबुरकर, सविता पुरी, गणेश आजणे, आशीष पांडे, प्रवीण वैद्य, जानवी सोळंकी, सोनाली लांडे, भाग्यश्री ईखार, नरेश वडणारे, मोहसीन शेख, पिंटू छांगाणी, प्रवीण देशमुख, सुमीत बिजवे, निलेश एकोनकार, प्रमोद बिजवे, विजय कदम, रंजीत कदम, श्याम कदम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान धनोडी (ना.) येथील अशोक देढे यांच्या कुटुंबियांना गाय, मांडला येथील अरुण चरपे, चिंचोली येथील उत्तम सयाम, आष्टी तालुक्यातील देविदास ठाकरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन शेळ्या वितरित करण्यात आल्या. तर वाढोणा येथील शेतकरी वैभव इंगळे यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा येलचटवार यांनी केले. कार्यक्रमात आस्थाच्या विदर्भ समन्वयक पदी बंडू कडू तर अमरावती जिल्हा समन्वयक पदी विलास माहूरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला कैलास ईखार, चिंदुजी झामरे, चंद्रशेखर नेहारे, सुरेश खवशी, नितीन सहारे, डॉ. राऊत, मंगेश टाक, समीर जगताप, धीरज लाडके, शुभम राऊत, प्रज्वल लांडे, शामल देशमुख, योगेश बांडे, मनोज मनवर, नीरज जयस्वाल, इंद्रदास बेनोटे, दिनेश हरले आदींची उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचाल
मागील टप्प्यात सदर संस्थेच्या पुढाकाराने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. इतकेच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दहा हजार रुपये आणि आष्टी येथील अनाथ भावंडांना शिवसेना व आस्थातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदत देण्यात आली होती.

Web Title: Helping families of five suicidal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.