आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:40 PM2018-06-21T23:40:48+5:302018-06-21T23:40:48+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाला तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक चौधरी, सहायक निबंधक सहकारी संस्थाचे प्रतिनिधी ठाकरे, बाजार समितीचे सभापती दिलीप काळे, उपसभापती ज्ञानेश्वर पडोळे व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उमेश घोडखांदे यांनी केले. प्रास्ताविक समितीचे प्रभारी सचिव विनोद कोटेवार यांनी केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्याकरिता दोन मिनीट मौन पाळून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. समितीचे सदस्य संदीप काळे, अ.सं. लोहकरे, राजू पावडे, तहसीलदार व ठाणेदार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप काळे यांनी उपस्थित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारस व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. घरातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्या केल्याने मोठे संकट कोसळते. अशा संकटग्रस्त परिवारांना मदतीचा हात देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळवून देण्याकरिता शासनाने पूर्वतयारी करून गोदामांची पूर्तता करावी वा बाजार समित्यांना गोदाम बांधण्याची परवानगी द्यावी. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य भाव मिळू शकेल, असे सांगितले.
याप्रसंगी अतिथी व संचालक यांच्या हस्ते १४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले. अनुदान ही रक्कम ज्योती श्रीधरराव कदम, श्रीकृष्णराव काळकर, सुशीला लोखंडे, वैष्णवी जामखुटे, गोविंद भुसाटे, इंदिरा सोनटक्के, कृष्णा मेश्राम, भावना मानकर, निकहत परवीन परवेज खाँ पठाण, सुलभा बगेकर आदी आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे वारस उपस्थित होते. २०१७-१८ च्या उन्हाळी परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील एमए मराठी या विषयात प्रथम आलेल्या रूपाली महादेव ठाकरे या आर्वी बाजार समिती क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणासाठी ५००० रुपये मदत देण्यात आली. आभार लेखापाल चेतन निस्ताने यांनी मानले.