भीमाल पेन कलामंचास आमदार चषक पुरस्कार

By admin | Published: May 14, 2016 02:06 AM2016-05-14T02:06:23+5:302016-05-14T02:06:23+5:30

जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय आदिवासी कला महोत्सव शुक्रवारी घेण्यात आला.

Hemant Pen Kalamanchas MLA Trophy Award | भीमाल पेन कलामंचास आमदार चषक पुरस्कार

भीमाल पेन कलामंचास आमदार चषक पुरस्कार

Next

वर्धा : जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय आदिवासी कला महोत्सव शुक्रवारी घेण्यात आला. यात गोंडी नृत्य स्पर्धेचा आमदार चषक पुरस्कार वर्धा येथील भीमाल पेन कला मंच तर समुह गीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार बिरसा मुंंडा मंडळाने प्राप्त केला.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूराव पाटील उईके, जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष राजू मडावी, सचिव हरिदास टेकाम, कोषाध्यक्ष मोहन मसराम, तारा खंडाते, सरस्वता मडावी, मेघा उईके, अंजना आडे, नगरसेवक शरद आडे, प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी, अशोक मानकर, अशोक कलोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, चेतन पेंदाम व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी विदर्भातून २३ संघ सहभागी झाले होते. समुह नृत्यस्पर्धेचा प्रथम पुरस्कार आमदार चषक वर्ध्यातील भीमाल पेन कला मंच, द्वितीय पुरस्कार नरखेड येथील जंगो लिंगो नृत्य संच, तृतीय बेलगाव येथील बापूराव शेडमाके नृत्य संचाला देण्यात आला. आदिवासी समुह गीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार वर्धा येथील बिरसा मुंडा भजन मंडळ, द्वितीय नागपूर येथील राज गोंदुलाल भजन मंडळ, तृतीय पुरस्कार वर्धा येथील बाल गोपाल भजन मंडळास महिला कार्यकर्त्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन्ही स्पर्धेतील प्रथम पुरस्कार आमदार डॉ. भोयर यांच्यातर्फे देण्यात आले. आयोजनासाठी अमृत मडावी, वसंत मसराम, चंद्रभान खंडाते, विजय म्हरस्कोल्हे, राजेंद्र मसराम, राजेंद्र मडावी, नंदकिशोर बिसने, शंकर म्हरस्कोल्हे, द्वारकाप्रसाद राऊत, नागोराव मसराम, केशव सयाम, केशव पुरके, दादाराव इवनाथे, शंकर उईके, दिगंबर पेंदाम, किसन कौवरती, गंगाधर पुरके, विठ्ठल इवनाथे, सुखदेव आत्राम यांनी सहकार्य केले.(शाहर प्रतिनिधी)

Web Title: Hemant Pen Kalamanchas MLA Trophy Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.