अतिक्रमणधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:34 PM2018-02-16T22:34:28+5:302018-02-16T22:34:55+5:30

सेवाग्राम भागातील कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात व सेवाग्राम येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

High Court relief to encroachment holders | अतिक्रमणधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

अतिक्रमणधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Next
ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था केल्याशिवाय अतिक्रमण काढू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम भागातील कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात व सेवाग्राम येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय अतिक्रमण काढू नयेत अशा सूचना केल्या आहेत. या सूचना अतिक्रमण धारकांना दिलासा देणाºया ठरत आहेत.
सदर ठिकाणी जलसंधारणाची व इतर सौंदर्यीकरणाची कामे होणार असल्याने अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २०१७ ला बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सा. बां. विभाग वर्धाचे उपअभियंता, पं.स.चे गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीत सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी काही सूचना केल्या होत्या. एकूण अतिक्रमीत क्षेत्रातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण १६ एप्रिल २०१७ पर्यंत काढण्याबाबत फेरीवाल्यांना नोटीस देवून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही यावेळी सांगण्यात आले ंहोते. ज्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. अशा फेरीवाल्यांसाठी सेवाग्राम हेल्थ सोसायटी येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमीत फेरीवाल्यांची नोंदणी ग्रा.पं. सेवाग्राम यांनी करावी व सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये गाळे व जागा उपलब्धतेनुसार अतिक्रमीत फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सेवाग्राम हेल्थ सोसायटीला कळवावे. शिवाय त्यानुसार जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या होत्या. या सूचना लेखी प्राप्त झाल्यावर सेवाग्राम ग्रा.पं. व कस्तुरबा हेल्थ सोसायटी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सदर छोटे व्यावसायिक दररोज रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर दुकान लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत;पण नायब तहसीलदारांनी २३ नोव्हेंबरला अतिक्रमण काढण्याचे ठरविले व तशा नोटीस फुटपाथ दुकानदारांना दिल्या. परिणामी, दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती जोशी यांनी दुकानदार फेरीवाल्यांना पर्यायी जागा देईपर्यंत अतिक्रमण काढण्यात येवू नये असे आदेश निर्गमित केल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने किशोर देऊळकर यांनी कळविले आहे. याचिकाकर्तांची बाजू अ‍ॅड. सौरव चौधरी यांनी मांडली. न्यायालयाच्या या आदेशामुळे सेवाग्राम मेडीकल चौक भागातील अतिक्रमण करून रस्त्यावर विविध साहित्य विक्रीचे दुकान लावणाºयांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे छोट्या व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.

Web Title: High Court relief to encroachment holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.