हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:54 PM2018-01-08T23:54:11+5:302018-01-08T23:54:50+5:30

देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे.

Hindi national asmita, make the language of self respect | हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी

हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी

Next
ठळक मुद्देकेशरीनाथ त्रिपाठी : हिंदी विद्यापीठाचा २० वा स्थापना दिवस

आॅनलाईन लोकमत
वर्धा : देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचा २० व्या स्थापना दिवस सोमवारी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्र्वाचन विद्यापीठ भवनाच्या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार रामदास तडस तर भारतीय जनसंचार संस्था, नवी दिल्लीचे महानिदेशक डॉ. के.जी. सुरेश मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. मनोज कुमार, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. देवराज, प्रो. एल. कारूण्यकरा मंचावर उपस्थित होते.
राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी म्हणाले की, विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे एका दृढ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिध्द करत आहे. वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे.
भारतीय जनसंचार संस्थान दिल्लीचे महानिदेशक प्रो.के. जी. सुरेश यांनी शिक्षा का वैश्विक परिदृश्य और भारतीय शिक्षा प्रणाली या विषयावर विचार मांडले. खासदार रामदास तडस म्हणाले, की २० वर्षाआधी विश्वविद्यालयाचा पाया एका छोट्याशा रोपट्याने झाला जो आज २० वर्षांनी वटवृक्षासमान विस्तारित झाला आहे. विश्वविद्यालयामुळे वर्धेचा गौरव देश-विदेशात वाढत आहे. केंद्रीय विद्यालयाच्या रूपाने एक मोठी उपलब्धी विश्वविद्यालयाची म्हणता येईल, असे ते म्हणाले.
कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र म्हणाले की हिंदीला समृध्द करण्यासाठी हे विश्वविद्यालय कार्यरत आहे. विश्वविद्यालय दिवसेंदिवस क्षमता वाढवित आहे. येथील विद्यार्थी देश-दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. यावेळी त्यांनी विश्वविद्यालयाचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले.
संचालन प्रो. प्रिती सागर यांनी केले तर आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोप बॅँडवर राष्ट्रगीत वाजवून करण्यात आला. मुख्य कार्यक्रमापुर्वी महामहीम राज्यपालांनी गांधी हिल्सवरील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
विदेशी साहित्यिकांचा सत्कार
विश्वविद्यापीठाच्यावतीने मालती जोशी, मध्यप्रदेश, डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र ओरिसा, तेजेंद्र शर्मा लंडन, डॉ. रणजीत साहा दिल्ली, डॉ. तातयाना ओरांसकाइया जर्मनी, प्रो. मिलेना ब्राटोइएवा बल्गारिया, डॉ. पी.के. बालसुब्रमण्यम तामिळनाडु, सुरेश शर्मा महाराष्टÑ यांना राज्यपालांच्या हस्ते हिंदी सेवा सन्मान प्रदान करण्यात आला.

Web Title: Hindi national asmita, make the language of self respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.