हिंगणघाट जळित प्रकरण; राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:48 PM2020-02-10T12:48:16+5:302020-02-10T12:48:41+5:30

Hinganghat Burn Case; जळित प्रकरणात बळी गेलेल्या प्राध्यापिकेवर अंत्यसंस्काराची तयारी एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे गावकऱ्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हिंगणघाट-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे.

Hinganghat burning case; Stop along the national highway | हिंगणघाट जळित प्रकरण; राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

हिंगणघाट जळित प्रकरण; राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट: जळित प्रकरणात बळी गेलेल्या प्राध्यापिकेवर अंत्यसंस्काराची तयारी एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे गावकऱ्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हिंगणघाट-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. या तरुणीचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक निघाले असून ते कोणत्याही वेळी हिंगणघाटात दाखल होण्याची शक्यता आहे.
तिच्या मारेकºयाला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या, त्याला जाळूनच ठार करा अशा संतप्त मागण्या घेऊन काही नागरिक राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देऊन बसले आहेत. या महामार्गावरील वाहतूक त्यामुळे अंशत: अवरुद्ध झाली असून पोलिस परिस्थितीवर नियंत्रण राखून आहेत. हिंगणघाटात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शाळा, महाविद्यालये, दुकाने सर्व बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या पिडितेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोक्षधाम घाटात तयारी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Hinganghat burning case; Stop along the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.